स्मारके

बाबरी मशीद (Babri Masjid)

बाबरी मशिद Babri Masjid Information in Marathi

बाबरी मशीद ही भारतातील अयोध्येतील एक मशीद होती. हि मशीद उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक होती. १९४०च्या दशकापूर्वी या मशिदीला मशिद-ए-जन्मास्थान असे म्हटले जायचे. मशिदीच्या शिलालेखानुसार, ही मशीद मोगल बादशाह बाबरच्या आदेशानुसार मीर बाकी यांनी १५२८-२९ मध्ये बांधली होती.

बाबरी मशीद रामकोट (रामाचा किल्ला) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर बांधली गेली होती. असे म्हटले जाते की मीर बाकीनी या ठिकाणचे पूर्वीचे रामाचे मंदिर नष्ट करून तिथे मशीद बांधली. या ठिकाणच्या मंदिराचे अस्तित्व हा अजूनही वादाचा विषय आहे. २००३ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या अहवालात असे सूचित केले आहे की या ठिकाणी एक जुनी रचना अस्तित्वात होती, पण ते राम मंदिर होते याचा पुरावा नाही. येथील राम मंदिर तोडून बांधलेली बाबरी मशीद यावरच्या विवादाला अयोध्या विवाद किंवा राम जन्मभूमी खटला म्हणून ओळखले जाते.

१९व्या शतकापासून या मशिदीवरून हिंदू व मुस्लिम यांच्यात अनेक संघर्ष झाले आणि कोर्टात अनेक खटले भरले गेले आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी हिंदू कार्यकर्त्यांनी बाबरी मशीदच्या केलेल्या विध्वंसामुळे संपूर्ण भारतात दंगली घडल्या ज्यात सुमारे दोन हजार लोक ठार झाले त्यापैकी बरेच मुस्लिम होते.

व्युत्पत्ती

बाबरी मस्जिद हे नाव मुघल बादशहा बाबरच्या नावावरुन आले ज्याने मशिदीचे बांधकाम करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले जाते. १९४०च्या दशकाआधी, याला मशिद-ई-जन्मास्थान म्हटले जात असे.

वास्तुकला

मुघल हे कला आणि स्थापत्य कलाचे महान संरक्षक होते आणि त्यांनी अनेक उत्तम थडगे, मशिदी आणि मदरसे बांधले. या संरचनामध्ये एक विशिष्ट शैली आहे ज्यात “तुघलक” वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. संपूर्ण भारतातील मशिदी वेगवेगळ्या शैलीत बांधल्या गेल्या. मशिदीच्या वास्तुकलेवर स्थानीय हवामान, भूप्रदेश, साहित्य, कारागीर, संसाधनाची उपस्थिती यांचा प्रभाव पडला म्हणून बंगाल, काश्मीर आणि गुजरातच्या मशिदींमध्ये प्रचंड फरक आहे. बाबरी मशिदीच्या वास्तुकलेवर जौनपूर सल्तनतच्या स्थापत्यशाळेच्या प्रभाव पडला. पश्चिमेकडील बाजूने पाहिले असता बाबरी मशीद जौनपुरमधील अटाला मशिदी सारखी दिसत असे.

बाबरी मशीद विध्वंस

एप्रिल १९८४ मध्ये, विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) बाबरी मशीद आणि कथितपणे हिंदूंच्या मंदिरांवर बांधल्या गेलेल्या अन्य वास्तूंमध्ये हिंदूंच्या प्रवेशासाठी सार्वजनिक पाठिंबा गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली. जनजागृती करण्यासाठी, विहिंपने देशव्यापी रथयात्रेचे नियोजन केले. त्यातील पहिली सितंबर-ऑक्टोबर १९८४ मध्ये सीतामढी ते अयोध्या पर्यंत झाली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती, परंतु २३ ऑक्टोबर १९८५ ला २५ ठिकाणाहून पुन्हा चालू करण्यात आल्या.

२५ जानेवारी १९८६ रोजी बाबरी मशीद परिसरातील हिंदूंच्या उपासनेवरील निर्बंध हटवावेत, असे २८ वर्षीय स्थानिक वकील उमेशचंद्र पांडे यांनी कोर्टाकडे अपील केले. त्यानंतर राजीव गांधी सरकारने बाबरी मशीद दरवाजावरील कुलूप काढून घेण्याचे आदेश दिले. यापूर्वी, त्या जागेवर फक्त पुजाऱ्यांना परवानगी होती. या निर्णयानंतर सर्व हिंदूंना त्या जागेवर प्रवेश देण्यात आला आणि मशिदीचा काही प्रमाणात हिंदू मंदिर म्हणून वापर होऊ लागला.

नोव्हेंबर १९८९ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी विहिंपने वादग्रस्त ठिकाणी शिलान्यास करण्याची परवानगी मिळविल्यानंतर या प्रदेशातील जातीय तणाव आणखी वाढला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली , दक्षिणेकडून प्रारंभ करुन अयोध्याच्या दिशेने १०००० कि.मी.चा प्रवास सुरू केला.

६ डिसेंबर १९९२ रोजी, भाजपा, व्ही.एच.पी आणि आर.एस.एस नेते प्रार्थना आणि प्रतीकात्मक कार सेवा करण्यासाठी एकत्र जमले. दुपारच्या वेळी, एक किशोर कार सेवक (स्वयंसेवक) मशिदीच्या घुमटावर चढला आणि त्याने बाहेरील मशिदीच्या भिंती तोडण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मोठ्या संख्येने कारसेवकांनी मशिदी पाडली.

परिणाम

मशीद पाडल्यानंतर लगेचच हिंदु-मुस्लीम यांच्यात जातीय दंगली झाल्या. यामुळे अंदाजे २ हजार लोक मरण पावले. मुंबईमध्ये सहा आठवड्यांच्या दंगलीत २५७ लोक मारले गेले.

इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तैयबासारख्या जिहादी संघटनांनी बाबरी मस्जिदच्या विध्वंसाचे औचित्य साधून भारतावर आतंकवादी हल्ले केले. असे मानले जाते की, १९९३ च्या बॉम्बस्फोटात २५७ लोक ठार मारल्या गेलेल्या हल्ल्यांशी संबंधित असलेल्या गँगस्टर दाऊद इब्राहिमला ही बाबरी मशीदच्या विध्वंसामुळे ते चिडला होता.

प्रादेशिक प्रभाव

बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर बांगलादेशातही दंगली झाल्या, ज्यात हिंदूंची शेकडो दुकाने, घरे आणि मंदिरे नष्ट केली गेली. शेजारच्या पाकिस्तानमध्येही बर्‍याच हिंदू आणि जैन मंदिरांवर व्यापक हल्ला करण्यात आला. बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला.

लिबरहान कमिशन

या विध्वंसच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या लिबरहान कमिशनने नंतर या विध्वंससाठी वरिष्ठ भाजपा, आरएसएस आणि विहिंप नेत्यांसह ६८ जणांना दोषी ठरवले. या अहवालात टीका करण्यात आलेल्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी, पक्षाचे प्रमुख लालकृष्ण अडवाणी आणि तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह हे होते. माजी इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) सह संचालक मलोय कृष्णा धार यांनी २००५ मधील आपल्या पुस्तकात दावा केला आहे की आरएसएस, भाजपा, व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या ज्येष्ठ नेत्यांनी १० महिन्यांपूर्वी या विध्वंसची योजना आखली होती. त्यांनी असेही सुचवले की पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव आणि गृहमंत्री एस. बी. चव्हाण यांच्यासह भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नेत्यांनी राजकीय लाभ मिळवण्याच्या विध्वंसविषयीच्या इशाऱ्यांकडे कडे दुर्लक्ष केले.

सूचना: अयोध्या विवाद किंवा राम मंदिर खटल्या बद्दल तुम्ही दिलेल्या लिंक वर वाचू शकता.

Reference: Babri Masjid

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.