चित्रपट करमणूक

बॉईज (चित्रपट)

Information about Boyz in Marathi

बॉईज हा २०१७ प्रदर्शित, विशाल देवरुखकर दिगदर्शित, लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित आणि गायक अवधूत गुप्ते यांनी सादर केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणि रितिका श्रोत्री मुख्य भूमिकेत आहेत. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी बॉईज २ नावाचा सिक्वेल रिलीज झाला.

बॉईज चा प्लॉट

कबीर “गायत्री” पाणिग्रहीची ही कहाणी आहे, ज्याला त्याच्या आईने एकटीने वाढवले आहे. आपल्या वडिलांबद्दलच्या प्रश्नांचा सामना करून तो दमला आहे. कबीरच्या वडिलांचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा त्याची आई चर्चेपासून दूर पाळते, ज्याने आई-मुलामध्ये खोल दरी निर्माण केली आहे. दोघांमधील संवादाचा एकच धागा म्हणजे कबीरची काकू. घरातील तणावाच्या वातावरणामुळे त्याची आई आणि काकू कबीरला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात.

दोन वर्षानंतर, कबीर शाळेत रुळला आहे आणि एक यशस्वी विद्यार्थी ठरला आहे. पण तरीही त्याच्या वडिलांच्या अस्मितेविषयीचे प्रश्न अद्यापही त्याला भेडसावत आहेत.

धैर्य आणि धुंग्या ही दोन खेड्यांतील मुले कबीरच्या शाळेत प्रवेश घेतात. धैर्य आणि धुंग्या दोघेही खूप धांदरट असतात, त्यांच्या खोड्यांना कंटाळून ग्रामस्थांनी त्यांना दूर ठेवण्यासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेशाची व्यवस्था केली आहे. बोर्डिंग स्कूल मध्ये येताच ते त्यांचे रंग दाखवण्यास सुरूवात करतात.

धैर्य आणि धुंग्याच्या उपस्थितीचा परिणाम कबीरवर होईल काय? तो सकारात्मक की नकारात्मक प्रभाव असेल? कबीरला त्यांची उत्तरे सापडतील का? कबीर आणि त्याच्या आईचे तुटलेले नाते सुधारले जाईल का? धैर्य आणि धुंग्या आपले मार्ग बदलून जबाबदार बनतील का? या प्रश्नांच्या अवती भोवती बॉईज चित्रपट घुमतो.

बॉईज कास्ट

सुमंत शिंदे: कबीर गायत्री पाणिग्रही
पार्थ भालेराव: धुंगराज ऊर्फ “धुंग्या”
प्रतीक लाड: धैर्यशील उर्फ ​​”धैर्य”
रितिका श्रुती: कृपा
संतोष जुवेकर: मंदार सर
शिल्पा तुळसकर: गायत्री पाणिग्रही (कबीरची आई)
शर्वरी जमेनिस: राधिका (कबीरची काकी)
झाकीर हुसेन: फर्नांडिज सर
भालचंद्र कदम: बबन
वैभव मांगले: नाम्या
अश्विनी महंगाडे: शिक्षिका

बॉक्स ऑफिस

बॉईज ८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाला आणि पहिल्या विकेंड मध्ये बॉक्स ऑफिसवर ३.७२ कोटी कमवले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ८.४० कोटीचे संकलन केले आणि बॉक्स ऑफिसवर एक आश्चर्यचकित करणारा ब्लॉकबस्टर बनला. ५ ऑक्टोबर रोजी बॉईज २ नावाचा सिक्वेल रिलीज झाला.

साउंडट्रॅक

चित्रपटाचे संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे आणि लिरिक्स अवधूत गुप्ते व वैभव जोशी यांनी लिहिले आहे. बॉईज मूव्ही मधील गाण्यांची यादी खाली दिली आहे. या गाण्यांपैकी “लग्नाळू” गाणे मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस पडले.

  1. लग्नाळू
  2. जीवना
  3. लेट्स बी फ्रेंड्स
  4. यारियां
  5. लंपट झंपट

इतर माहिती

दिग्दर्शक: विशाल देवरुखकर
निर्माता: लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, अवधूत गुप्ते (सादरकर्ता)
लेखक: राहुल ओडक, विशाल देवरुखकर
पटकथा: हृषिकेश कोळी
संगीत: अवधूत गुप्ते, वैभव जोशी
छायांकन: सिद्धार्थ जतला
संपादक: गुरू पाटील, महेश किल्लेकर
प्रॉडक्शन कंपनी: सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड
वितरक: पिकल एंटरटेनमेंट
रिलीज डेट: ८ सप्टेंबर, २०१७
काळ: १३५ मिनिटे
देश: भारत
भाषा: मराठी
बॉक्स ऑफिसः अंदाजे ८.४ कोटी (पहिला आठवडा)

Reference: Boyz

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.