सरकार

लोकशाही (Democracy)

लोकशाही Democracy Information in Marathi
Rama (Wikipedia)

लोकशाही (ग्रीक: δημοκρατία dēmokratía, शब्दशः “लोकांद्वारे शासन”) ही सरकारची एक प्रणाली आहे जिथे नागरिक मतदान करून शासन बनवतात.

थेट लोकशाहीमध्ये सर्व नागरिक एक प्रशासक मंडळाची स्थापना करतात आणि प्रत्येक विषयावर थेट मतदान करतात. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये नागरिक आपापसांत प्रतिनिधी निवडतात. हे प्रतिनिधी एकत्र येऊन विधिमंडळासारख्या प्रशासकीय मंडळाची स्थापना करतात.

उदारमतवादी लोकशाहीमध्ये बहुमताच्या अधिकारांचा उपयोग लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या चौकटीत केला जातो, परंतु राज्यघटना बहूसंख्यांकाना मर्यादित करते आणि अल्पसंख्यांकाचे संरक्षण करते, सामान्यत: विशिष्ट वैयक्तिक अधिकारांद्वारे जसे बोलण्याचे स्वातंत्र्य किंवा सहकार्याचे स्वातंत्र्य.

बहुमत शासन सामान्यपणे लोकशाही म्हणून ओळखळी जाते. जॉन लॉक यांनी लिहिले: “बहुसंख्य राजकीय शासनसाठी कोणताही व्यावहारिक पर्याय नाही – म्हणजे बहुमताची संमती अंतिम कृती म्हणून मानणे आणि ती प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक असणे. कोणतेही कार्य करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची संमती घेणे अशक्य आहे. सामूहिकरित्या: कोणताही तर्कसंगत व्यक्ती अश्या समाजात राहू इच्छिणार नाही जिथे बहुमत अंतिम निर्णय घेण्यास असमर्थ असेल आणि समाज एकजीव बनून काम करण्यास असमर्थ असेल.”

डेमोक्रसी (लोकशाही) या शब्दाचा वापर इ.स.पू. ५व्या शतकात ग्रीक शहर-राज्यांमध्ये (विशेषत: अथेन्स) अस्तित्त्वात असलेल्या राजकीय व्यवस्था दर्शविण्यासाठी करण्यात आला होता; लोकशाही शब्दाचा चा अर्थ “लोकांचे राज्य” असा आहे. हि नवीन व्यवस्था त्याकाळच्या (ऍरिस्टोक्रॅसी) खानदानी व्यस्थेच्याच्या विरोधात उभी झाली होती, यालाच “एलिटचे शासन” म्हणले जायचे. सैद्धांतिकदृष्ट्या या व्याख्या विरोधात असताना, प्रत्यक्षात मात्र हा फरक ऐतिहासिकदृष्ट्या अस्पष्ट होता.

उदाहरणार्थ, अथेन्सच्या राजकीय व्यवस्थेने मुक्त पुरुषांना लोकशाही नागरिकत्व दिले पण गुलाम व स्त्रियांना राजकीय सहभागापासून दूर ठेवण्यात आले . प्राचीन आणि आधुनिक इतिहासाच्या अक्षरशः सर्व लोकशाही सरकारांमध्ये लोकशाही नागरिकत्वामध्ये उच्चभ्रू वर्गाचा समावेश होता. १९व्या आणि २०व्या शतकात सर्व नागरिकांना सामान हक्क मिळवण्यासाठी खूप चळवळी आणि संघर्ष करावा लागला.

लोकशाही सरकार अश्या व्यवस्थेचा विरोध करते जिथे सत्ता एखाद्या व्यक्तीकडे असते (निरपेक्ष राजशाही, absolute monarchy) किंवा जिथे एक छोटा गट पूर्ण देशावर राज्य करतो (oligarchy). तथापि, हे विरोध आता संदिग्ध आहेत कारण समकालीन सरकारांमध्ये लोकशाही, कुलीन आणि राजशाही घटकांचे मिश्रण आहे. लोकशाही ही हुकूमशाही (dictatorship) किंवा जुलुमशाही (tyranny) च्या विरोधात असते. लोकशाही मध्ये लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नेत्यांना निवडते व नियंत्रित करते आणि त्यांना काढून टाकण्यासाठी क्रांतीची गरज भासत नाही.

Source: Democracy

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment