सण

दिवाळी (Diwali)

दिवाळी सणाची मराठी माहिती, निबंध
Pexels

दिवाळी, दीपावली हा चार ते पाच दिवसांचा दीपोत्सवाचा उत्सव आहे, जो हिंदू, जैन, शीख आणि काही बौद्ध प्रत्येक शरद ऋतू मध्ये साजरा करतात. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय. सणाच्या विधी विशेषत: पाच दिवस असतात. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यभागी किंवा नोव्हेंबरच्या मध्यभागी हा सण येतो.

दिवाळीच्या अगोदर लोक त्यांची घरे, कामाची ठिकाणे साफ करून, त्यांचे नूतनीकरण करून सजावट करतात. दिवाळीमध्ये नवनवीन कपडे, भेटवस्तू खरेदी केल्या जातात. घर-अंगण दिवे अन पणत्यांनी सजवले जाते. उंबरठा समोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात, दारांना तोरणे बांधली जातात. दिवाळीमध्ये फटाके सुद्धा फोडतात आणि मित्र-मैत्रिणी, शेजारी, नातेवाईकांना फराळाला घरी बोलवतात, त्यांना भेटवस्तू देतात. भारतीय उपखंडातील आणि बाहेरील हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध डायस्पोराही दिवाळी अगदी आनंदाने साजरी करतात.

दिवाळी या सणाची सुरुवात भारतीय उपखंडात झाली आहे आणि त्याचा उल्लेख काही संस्कृत ग्रंथात देखील आहे. दिवाळीतील सणांची नावे आणि विधि भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या आहेत. दिवाळी सहसा दसऱ्यानंतर १८ दिवसांनी असते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, या दिवशी लोक पहाटे लवकर उठून घराची साफसफाई करून, दारासमोर रांगोळी काढून, पूजा अर्चना करतात. दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. पश्चिम, मध्य, पूर्व आणि उत्तर भारतीय समुदाय दिवाळीच्या तिच्या दिवसाला मुख्य सण म्हणून साजरा करतात, हा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, त्यादिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते जी धन आणि संपत्ती ची देवी आहे.

चौथा दिवस गोवर्धन पुजा किंवा बलिप्रतिपदा (पाडवा) म्हणून साजरा करतात, हा सण पती-पत्नीतील नात्यांचे प्रतीक आहे. भारतातील काही भागात दिवाळीच्या शेवटचा दिवस भाउबीज म्हणून साजरा करतात, भाऊबीज हा सण बहीण भावाच्या नात्याला समर्पित केलेला आहे. काही हिंदू आणि शीख समाजामध्ये हा दिवस विश्वकर्मा पूजा म्हणून साजरा केला जातो, ते आपले कामाचे ठिकाण आणि साधने यांची पूजा करतात.

दिवाळीच्या सणाच्या दरम्यान विविध धर्मातील लोक आपआपले सण साजरे करतात. भगवान महावीरांच्या मुक्तीचे प्रतीक म्हणून जैन लोक दिवाळी साजरी करतात. मुघल साम्राज्याचा तुरुंगातून गुरू हरगोविंद यांच्या सुटकेच्या निमित्ताने शीख बंदी छोड दिवस साजरा करतात. नेवर बुद्ध लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात तसेच बंगाली हिंदू देवी काली ची पूजा करून दिवाळी साजरी करतात. दिवाळीचा मुख्य सण म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी फिजी, गयाना, भारत, मलेशिया (सरवाक सोडून), मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे सुट्टी असते.

नाव आणि तारखा

दिवाळी शब्द संस्कृतमधील आहे. दीपावली म्हणजे “दिव्यांची रांग”. संयुग्मित संज्ञा संस्कृत शब्द दीप ( दिवा, प्रकाश, कंदील, मेणबत्ती, चमकणारी, प्रकाश देणारी वस्तू किंवा ज्ञान) आणि अवली (पंक्ती, रेषा, मालिका) पासून बनते.

पाच दिवसांचा हा सण दरवर्षी कापणीच्या समाप्तीनंतर शरद ऋतूच्या सुरूवातीस साजरा केला जातो. अमावस्याच्या दोन दिवस अगोदर सण चालू होतो आणि दोन दिवसानंतर संपतो. इंग्लिश कॅलेंडर नुसार दिवाळीच्या तारखा दरवर्षी बदलतात, पण दिवाळीची तारीख ऑक्टोबर आणि नोव्हेंबर च्या मध्येच असते. या वर्षी दीपावली रविवार २७ ऑक्टोबर ला आहे.

इतिहास

दिवाळीचा सण हा प्रामुख्याने प्राचीन भारतात कापणीचा सण होता. याचा पद्म पुराण, स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे. दिव्यांचा उल्लेख स्कंद किशोर पुराणात आहे ज्याला सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे जो सर्व जीवनास प्रकाश आणि उर्जा देणारा वैश्विक दाता आहे.

७व्या शतकातील नागानंद या संस्कृत नाटकात राजा हर्षाने दीपावलीचा उल्लेख “दीपप्रतिपदोत्सव” असा केला होता. ज्या दिवशी दिवे लावले जायचे आणि नववधू आणि वरांना भेटवस्तू दिल्या जात असत. राजशेखरांनी आपल्या ९व्या शतकातील काव्यमिमांसामध्ये दीपावलीचा उल्लेख “दिपामलीका” म्हणून केला. त्यामध्ये त्यांनी घरे स्वच्छ करून रात्रीच्या वेळी तेलाच्या दिव्यांनी घर, रस्ते आणि बाजारपेठा सजवण्याच्या परंपरेचा उल्लेख केला आहे.

भारताबाहेरील असंख्य प्रवाश्यांनीही दिवाळीचे वर्णन केले आहे. अकराव्या शतकातील त्यांच्या “मेमॉयर ऑफ इंडिया” मध्ये पर्शियन प्रवासी व इतिहासकार अल बिरुनी यांनी कार्तिक महिन्यात अमावस्येच्या दिवशी हिंदूंनी दिपावली साजरी केल्याबद्दल लिहिले होते.

१५व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात व्हेनिसियन व्यापारी आणि प्रवासी “निकोला दे कॉन्टी” यांनी भारत भेट दिली आणि लिहिले की, या दिवशी लोक मंदिरात बसतात आणि छतावर असंख्य तेलाचे दिवे लावतात … जे रात्रंदिवस जळत असतात. आणि सारे कुटुंब एकत्र जमते, ते नवीन कपडे घालतात, गाणी गातात, नृत्य आणि मेजवानी असते.

१६व्या शतकातील पोर्तुगीज प्रवासी “डोमिंगो पेस” यांनी हिंदु विजयनगर साम्राज्याच्या भेटीबद्दल लिहिले आहे की, तिथे ऑक्टोबरमध्ये दिपावली साजरी केली गेली होती आणि लोक त्यांची घरे आणि मंदिरे दिवे लावून प्रकाशित केली होती.

दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य काळातील इस्लामिक इतिहासकारांनीही दिवाळी व इतर हिंदू उत्सवांचा उल्लेख केला होता. मुघल बादशहा अकबर याने काहींनी या उत्सवाचे स्वागत केले आणि सहभागी सुद्धा झाले, तर इतरांनी दिवाळी आणि होळी अशा सणांवर बंदी घातली. १६६५ मध्ये औरंगजेबाने हिंदू दर्मातील सणांवर बंदी घातली होती.

ब्रिटीश वसाहतीच्या काळातल्या प्रकाशनातही दिवाळीचा उल्लेख होता. सर विल्यम जोन्स जे संस्कृत आणि इंडो-युरोपियन भाषांवरील सुरुवातीच्या निरीक्षणासाठी प्रसिध्द असलेले फिलोलॉजिस्ट होते, यांनी १७९९ मध्ये प्रकाशित केलेल्या हिंदू उत्सवांवरील नोट मध्ये दिवाळीचा उल्लेख केला आहे. तत्कालीन बंगालमधील रहिवासी असलेल्या जोन्स यांनी अश्विन-कार्तिक महिन्यातील दिवाळीचे वर्णन असे केले. त्याणी लिहिले, पाच दिवसांपैकी चार दिवस खालीलप्रमाणे आहेत: भूताचतुर्दशी यमतेर्पणम (दुसरा दिवस), लक्ष्मीपुजा दिपानविता (दिवाळीचा दिवस), द्यूत प्रतिपत्ती बलिपूजा (४था दिवस) आणि भारती द्वितीया ( ५वा दिवस). जोन्स म्हणाले की, लक्ष्मीपुजा दिपानविता हा “लक्ष्मीच्या सन्मानार्थ, रात्री झाडे आणि घरांवर दिव्यांची सजावट करणारा महान उत्सव होता”.

शिलालेख

दिवाळीचा उल्लेख करणारे दगड आणि तांब्यातील संस्कृत शिलालेख संपूर्ण भारतभरात सापडले आहेत त्यात या सणाचे वर्णन दिपोत्सव, दिपावली, दिवाळी असे केले आहे.

उदाहरणे:

  1. दहाव्या शतकातील (९३९-९६७ सीई) राष्ट्रकूट साम्राज्यातील कृष्णा तिसरे यांच्या काळातील तांब्याच्या प्लेटच्या (शिलालेख) समाविष्ट आहे ज्यात दीपोत्सवाचा उल्लेख आहे.
  2. १२ व्या शतकातील कर्नाटकातील धारवाडच्या ईश्वर मंदिरात सापडलेल्या संस्कृत-कन्नड सिंदांच्या शिलालेखात हा सण “पवित्र सण” म्हणून दर्शविला गेला आहे.
  3. लोरेन्झ फ्रँझ किलहॉर्न जे भारतीय शिलालेखांचे भाषांतर करण्यासाठी प्रसिद्ध जर्मन इंडोलॉजिस्ट होते. त्यांच्या मते या उत्सवाचा उल्लेख १३व्या शतकातील केरळचा हिंदू राजा रविवर्मन समागमधीर च्या काळात रंगनाथ मंदिर संस्कृत शिलालेखातील ६व्या आणि ७व्या श्लोकात दिपोत्सव म्हणून केला गेला आहे.

धार्मिक महत्त्व

हिंदू, जैन, शीख आणि नेवार बौद्ध यांच्याद्वारे दिवाळी साजरी केली जाते. जरी प्रत्येक धर्मात हा सण भिन्न ऐतिहासिक घटना आणि कथांना चिन्हांकित करतो, परंतु असे असले तरी हा सण अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञान आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो.

हिंदू धर्म

भारतात दिवाळीचे धार्मिक महत्त्व प्रादेशिकपणे बदलते. हा सण विविध देवी-देवता, परंपरा आणि प्रतिकांशी संबंधित आहे. विविध प्रांतातील स्थानिक शरद ऋतूतील कापणीचे उत्सव हे धार्मिक गोष्टींच्या संदर्भाने एकत्र येऊन दिवाळी सण निर्माण झाला असावा, पण प्रत्येक प्रेदेशात त्यांनी आपली स्थानिक परंपरा टिकवून ठेवली असावी.

दिवाळीच्या दिवशी, विष्णूचा अवतार राम, लक्ष्मीचा अवतार सीता, शेषाचा अवतार लक्ष्मण आणि शिव अवतार हनुमान १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत पोहोचले. त्रेता युगात भगवान रामाच्या चांगल्या सैन्याने रावणाच्या वाईट सैन्यास पराभूत केले.

द्वापरयुगात भगवान विष्णूंनी कृष्णाचा अवतार घेऊन दानव नरकासुराचा वध केला. नरकासुर एक दुष्ट राजा होता त्याने पळवून नेलेल्या १६००० मुलींना भगवान कृष्णाने सोडवले. भगवान श्रीकृष्णाच्या नरकासुरावरील विजयानंतर दिवाळी साजरी केली गेली. दिवाळीच्या अगोदरचा दिवस नरक चतुर्दशी म्हणून स्मरण केला जातो, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

अनेक हिंदू लोक दिवाळीला धन-संपत्ती आणि भरभराटीची देवी आणि विष्णूची पत्नी लक्ष्मी यांच्याशी जोडतात. देव-देवता आणि असुरांनी दुधाच्या वैश्विक महासागरात मंथन केले त्यातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. पद्म पुराणांसारख्या अनेक पुराणांमध्ये म्हटले आहे की दिवाळीच्या रात्री लक्ष्मीचे विष्णूशी लग्न झाले.

पूर्व भारताकडील हिंदू दिवाळीत दुर्गा देवी किंवा तिचा रुद्र अवतार कालीची उपासना करतात. हा सण हि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. उत्तर भारतातील ब्रज भागातील आणि आसामचे काही भागातील हिंदू तसेच दक्षिणी तामिळ आणि तेलगू समुदाय दिवाळीला कृष्ण देवतांनी नरकसुराचा वध केल्याच्या सन्मानार्थ साजरा करतात. हा वध सुद्धा ज्ञानाचा अज्ञानावर आणि वाईटावर चंगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे.

जैन धर्म

जैन आणि हिंदू धर्माचे अभ्यासक जेफ्री लाँग सांगतात की जैन परंपरेनुसार दिवाळी “महावीर निर्वाण दिवस” म्हणून साजरी करतात जो महावीरांचा शारिरीक मृत्यू आणि अंतिम निर्वाण दर्शवितो. भारतातील बर्‍याच भागात साजरी केली जाणारी जैन दिवाळी हिंदू दिवाळीप्रमाणेच आहे, यातही दिवे लावणे आणि लक्ष्मी पूजन करण्याच्या प्रथा आहेत, तथापि, जैन दिवाळीचे केंद्रबिंदू हे महावीरांचे समर्पण आहे.

जैन परंपरेनुसार दीप प्रज्वलित करण्याची ही प्रथा प्रथम महावीरांच्या निर्वाणाच्या दिवशी इ.स.पू. ५२७ मध्ये सुरू झाली. जेव्हा महावीरांच्या अंतिम शिकवणीसाठी जमलेल्या १८ राजांनी घोषणा केली की “महान प्रकाश, महावीर” यांच्या स्मरणार्थ दिवे लावावेत. दिवाळीच्या उत्पत्तीची ही पारंपारिक श्रद्धा आणि जैनांना असलेले त्याचे महत्त्व त्यांच्या चित्रांसारख्या ऐतिहासिक कलाकृतींतून दिसून येते.

शीख धर्म

मुघल बादशहा जहांगीर यांच्या ग्वाल्हेर किल्ला तुरुंगातून गुरु हरगोबिंद यांच्या सुटकेच्या स्मरणार्थ आणि अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात प्रवेश केल्याच्या दिवशी शिखांनी बन्दी छोड़ दिवस म्हणून साजरा केला. शीख धर्म आणि शीख इतिहासाचे अभ्यासक, जे.एस. ग्रेवाल यांच्या मते शीख परंपरेतील दिवाळी सहाव्या गुरु हरगोबिंद आख्यायिकेपेक्षा जुनी आहे. शीखांचे तिसरे गुरु, गुरु अमर दास यांनी गोविंदवाल येथे ८४ पायर्‍यांची विहीर बांधली आणि शिखांना बैसाखी आणि दिवाळीच्या दिवशी पवित्र पाण्याने स्नान करण्यास सांगितले.

कालांतराने, हे वसंत ऋतू आणि शरद ऋतूतील सण शीख उत्सवातील सर्वात महत्वाचे बनले आणि अमृतसरसारख्या पवित्र स्थळांच्या वार्षिक तीर्थस्थळांचे केंद्रबिंदू बनले. दिवाळीचा सण शीख इतिहासातील तीन घटनांवर संबंधित आहे:-

  1. १५७७ मध्ये अमृतसर शहराची स्थापना
  2. मुगल कारागृहातून गुरु हरगोबिंद यांची सुटका
  3. दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करून दंड भरण्यात अयशस्वी झाल्याने आणि त्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने १७३८ मध्ये भाई मणि सिंह यांचा शहादत दिवस.

अमृतसरची दिवाळी भारतात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक सुवर्ण मंदिरात येतात.

बौद्ध धर्म

बहुतेक बौद्ध लोकांसाठी दिवाळी हा सण नाही, नेपाळमधील नेवार लोक याला अपवाद आहेत. ते विविध देवतांचा आदर करतात आणि लक्ष्मी पूजन करून दिवाळी साजरे करतात. नेपाळी खोऱ्यामधील नेवार बौद्ध लोकही दिवाळीचा सण पाच दिवसाचा नेपाळी हिंदू दिवाळी-तिहार उत्सव म्हणून साजरा करतात. काही निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये नेवार बौद्धांनी पारंपारिक उत्सव साजरा केला, दिवाळीच्या वेळी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली, तर ती संक्रांतीवाद नव्हे तर त्यांच्या सांसारिक उन्नतीसाठी कोणत्याही देवताची उपासना करण्यासाठी महायान बौद्ध परंपरेतील स्वातंत्र्याचे प्रतिबिंब आहे.

पाच सण

धनत्रयोदशी (धनतेरस)

धनत्रयोदशी: धन म्हणजे अर्थ संपत्ती आणि तेरस म्हणजे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावा दिवस आणि दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी बरेच हिंदू लोक आपले घर आणि व्यवसाय परिसर स्वच्छ करतात. लक्ष्मी आणि गणेशमूर्ती पुढे दिवे लावतात. महिला घरे आणि ऑफिसमधील प्रवेशद्वार सजवतात, रांगोळी काढतात. तांदळाचे पीठ, फुलांच्या पाकळ्या आणि रंगीत वाळूने बनवलेल्या रंगीबेरंगी रचना म्हणजे रांगोळी. कुटुंबातील इतर सदस्य घर, बाजारपेठ आणि मंदिराचे छप्पर आणि भिंती सजवतात. नवीन भांडी, घरगुती उपकरणे, दागिने, फटाके आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी देखील हा प्रमुख खरेदीचा दिवस आहे. धनतेरसच्या संध्याकाळी कुटुंबीय लक्ष्मी आणि गणेश यांची प्रार्थना करतात आणि खीर आणि बत्ताशांचा नैवेद्य दाखवतात.

ट्रेसी पिंचमॅनच्या मते, धनतेरस हे वार्षिक नूतनीकरण, साफसफाईचे आणि पुढील वर्षासाठी एक शुभ सुरुवात यांचे प्रतीक आहे. या दिवसातील “धन” हा शब्द देव धन्वंतरीला देखील सूचित करतो, आरोग्य आणि स्वास्थ्याची देवता. असे मानले जाते “लौकिक महासागराच्या मंथनातून” देवी लक्ष्मी सोबतच धन्वंतरीचा जन्म झाला. काही समुदाय, विशेषत: आयुर्वेदिक आणि आरोग्याशी संबंधित व्यवसायात सक्रिय असलेले धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवाचे हवन विधी करतात किंवा प्रार्थना करतात.

नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी

छोटी दिवाळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या किंवा नरक चतुर्दशी हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे. त्या दिवसाचा आणि त्यातील विधींचा अर्थ असा होतो कि, नरकात असणाऱ्या कोणत्याही आत्म्याला मुक्त करण्याचा हा मार्ग होय. काही हिंदूंसाठी, एखाद्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना करण्याचा दिवस . या उत्सवाच्या दिवसाची पौराणिक व्याख्या म्हणजे या दिवशी भगवान कृष्णाने असुर (राक्षस) नरकासुराचा वध केला. या दिवशी कृष्णाने नरकसुराने अपहरण केलेल्या १६००० कैदी स्त्रियांना मुक्त केले.

उत्सवयुक्त पदार्थ, विशेषत: मिठाई खरेदी करण्यासाठीही नरक चतुर्दशी हा प्रमुख दिवस आहे. पीठ, रवा, तांदूळ, चण्याचे पीठ, ड्रायफ्रूटचे तुकडे पावडर किंवा पेस्ट, दुधाचे पदार्थ (मावा किंवा खोया) आणि तूप वापरुन विविध प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. नंतर हे लाडू, बर्फी, हलवा, कचोरी, श्रीखंड आणि संदेश यासारख्या विविध रूपांमध्ये आकारतात. करंजी, शंकरपाळी, मालाडू, सुसियम, पोट्टुकदलाई सारखे चवदार खाद्यपदार्थ या पासून बनवले जातात. दुकाने दिवाळी-थीम असलेली सजावट करतात आणि मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री करतात. हि मिठाई ते पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी करतात. लक्ष्मीपूजनासाठी या दिवशी घरगुती पदार्थ बनवतात. छोटी दिवाळी हा दिवस मित्र, व्यावसायिक सहकारी आणि नातेवाईकांना भेट देऊन भेटवस्तू देण्याचा दिवस असतो.

हा दिवस साधारणपणे तामिळनाडू, गोवा आणि कर्नाटकमध्ये दिवाळी म्हणून साजरा केला जातो. पारंपारिकपणे, मराठी लोक आणि दक्षिण भारतीय हिंदूंना त्यादिवशी कुटुंबातील मोठयांकडून तेलाची मालिश केली जाते आणि ते सूर्योदयाच्या अगोदर सर्व विधी स्नान करतात. बरेच लोक त्यांच्या आवडत्या हिंदू मंदिरात जातात.

लक्ष्मीपूजन

तिसरा दिवस म्हणजे या उत्सवातील सर्वात महत्वाचा दिवस. ह्या दिवशी हिंदू, जैन आणि शीख मंदिरे आणि घरे दिव्यांच्या प्रखाशाने उजळून जातात, म्हणूनच तर याला दीपोत्सव म्हणतात. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग / माळा.

यादिवशी कुटुंबातील तरुण सदस्य वडीलधारे, जसे की आजी आजोबा आणि इतर ज्येष्ठ सदस्यांची या दिवशी भेट घेतात. छोटे व्यवसाय मालक धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन दरम्यान त्यांच्या कर्मचार्‍यांना भेटवस्तू किंवा विशेष बोनस देतात. या दिवशी दुकाने लवकर बंद केली जातात ज्यामुळे कर्मचार्‍यांना कौटुंबिक वेळेचा आनंद घेता येतो. दुकानदार आणि व्यावसायिक कार्यालय परिसरात पूजा विधी करतात. इतर काही सणांप्रमाणे विपरीत, हिंदू दिवाळीत लक्ष्मीपूजनासह साधारणत: पाच दिवसांच्या सणात उपवास करत नाहीत, उलट ते आपल्या कार्यस्थळे, समुदाय केंद्र, मंदिरे आणि घरी मेजवानी देतात.

पाडवा, बलिप्रतिपदा

दिवाळी नंतरचा सणाला विविध राज्यात विविध नावे आहेत जसे अन्नकुट (धान्याचे ढीग), पाडवा, गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा , बलि पद्यमी, कार्तिक शुक्ल प्रतिपदा. एका परंपरेनुसार, हा दिवस विष्णूच्या हस्ते बलीच्या पराभवाच्या कथेशी संबंधित आहे. दुसर्‍या अन्वयार्पणात पार्वती आणि शिव यांनी बारा चौरस आणि तीस तुकड्यांच्या फळीवर दूत (पासा) हा खेळ खेळल्याच्या आख्यायिकेचा उल्लेख केला आहे.

भाऊ बीज

उत्सवाच्या शेवटच्या दिवसाला भाई दुज, भाऊ बीज, भाऊ टिळक किंवा भाई फोंटा म्हणतात. हे रक्षाबंधन प्रमाणेच बहिणीच्या भावाच्या नात्याला साजरे करते. पण भाऊ बीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या कुटुंबाला भेटायला येतो. या उत्सवाच्या दिवसाचा अर्थ काही जण यमाची बहीण यमुना यमाचे टिळक स्वागत करणे दर्शविते. तर काहीजण मानतात या दिवशी नरकसुराचा पराभव केल्यानंतर भगवाब श्रीकृष्ण आपल्या बहिणीच्या घरी आले. बहीण सुभद्राने त्यांच्या कपाळावर टिळक लावून स्वागत केले.

Reference : Diwali

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment