देश भूगोल

इजिप्त (मिस्र, Egypt)

इजिप्त मिस्र Information about Egypt marathi
wikimedia

इजिप्त (मिस्र), अधिकृतपणे इजिप्तचे अरब प्रजासत्ताक, आफ्रिकेच्या ईशान्येकडील एक देश आहे. इजिप्तचा सीनाई प्रदेश आशिया खंडाच्या सीमेपलीकडे विस्तारलेला आहे. इजिप्तच्या उत्तरेस गाझा पट्टी व इस्त्राईल, पूर्वेस अकबा चे आखात व लाल समुद्र, दक्षिणेस सुदान, पश्चिमेस लिबिया आणि उत्तरेस भूमध्य समुद्र आहे. अकाबाच्या आखाताच्या पश्चिमेला जॉर्डन, लाल समुद्राच्या पलीकडे सौदी अरेबिया आहे. ग्रीस, तुर्की आणि सायप्रस भूमध्य समुद्रापलीकडे आहेत.

इजिप्तला खूप प्रदीर्घ इतिहासांलाभला आहे. इजिप्तला “संस्कृतीचा पाळणा” “क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन” म्हटले जाते. प्राचीन इजिप्तमध्ये लेखन, शेती, शहरीकरण, संघटित धर्म आणि केंद्र सरकारच्या काही सुरुवातीचा विकास पहिला गेला.

इस्लाम हा इजिप्तचा अधिकृत धर्म आहे आणि अरबी ही त्याची अधिकृत भाषा आहे. ९५ दशलक्षाहून अधिक रहिवासी असलेला इजिप्त हा उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि अरब जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. लोकसंख्या नुसार हा आफ्रिकेतील तिसर्‍या क्रमांकाचा (नायजेरिया आणि इथिओपिया नंतर) आणि जगातील पंधराव्या क्रमांकावर आहे.

तिथले बरेच लोक नाईल नदीच्या काठाजवळ राहतात. सुमारे ४०००० चौरस किलोमीटर क्षेत्र केवळ जिथे शेतीयोग्य जमीन आढळते. इजिप्तच्या बहुतांश प्रदेश सहारा वाळवंटाने व्यापला आहे जिथे फारच कमी लोक राहतात. इजिप्तचे जवळपास अर्धे रहिवासी शहरी भागात राहतात आणि बहुतेक मोठ्या शहरात जसे काइरो, अलेक्झांड्रिया आणि नाईल डेल्टा जवळचे भाग.

इजिप्तची अर्थव्यवस्था मध्यपूर्वेतील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे आणि २१ व्या शतकातील जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थापैकी एक होण्याचा अंदाज आहे. २०१६ मध्ये इजिप्तने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून आफ्रिकेची दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था (नायजेरिया नंतर) झाली. इजिप्त हे संयुक्त राष्ट्र, अरब लीग, आफ्रिकन युनियन आणि इस्लामिक सहकार संघटना यांचे संस्थापक सदस्य आहेत.

इतिहास

गीझा नेक्रोपोलिस आणि त्याचे ग्रेट स्फिंक्स सारखे प्रतीकात्मक स्मारके तसेच मेम्फिस, थेबेस, कर्नाक आणि द व्हॅली ऑफ द किंग्ज इजिप्त मध्ये आहेत. इजिप्तचा प्रदीर्घ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा हा त्याच्या राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे, जो ग्रीक, पर्शियन, रोमन, अरब, तुर्क आणि तुबानी सारख्या परदेशी प्रभावांपुढे अनेकदा टिकून राहिला आहे. इजिप्त हे ख्रिश्चन धर्माचे एक प्रारंभिक आणि महत्त्वपूर्ण केंद्र होते, परंतु सातव्या शतकात मोठ्या प्रमाणावर इस्लामीकरण करण्यात आले आणि मुख्यतः मुस्लिम देश बनला.

१६व्या शतकापासून २०व्या शतकाच्या सुरूवाती पर्यंत इजिप्तवर परदेशी शक्तींचे राज्ये होती जसे तुर्क (ऑटोमन) साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य. आधुनिक इजिप्तचा जन्म १९२२ सालचा आहे, जेव्हा त्यांनी ब्रिटीश साम्राज्याकडून नाममात्र स्वातंत्र्य मिळवले. तथापि, इजिप्तवर ब्रिटीश लष्करी कब्जा चालूच होता आणि बर्‍याच इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की राजशाही ब्रिटीश वसाहतवादाचे डोसारे रूपच आहे.

१९५२च्या क्रांतीनंतर इजिप्तने ब्रिटीश सैनिक आणि नोकरशहाची हकालपट्टी केली आणि ब्रिटीशांचा ताबा संपवला. त्यांनी ब्रिटीशांच्या ताब्यात असलेल्या सुएझ कालव्याचे राष्ट्रीयकरण केले, राजा फारूक आणि त्याच्या कुटुंबाला हद्दपार केले आणि स्वत: ला प्रजासत्ताक म्हणून घोषित केले. १९५८ मध्ये ते सिरियामध्ये विलीन झाले आणि संयुक्त अरब रिपब्लिक बनले, जे १९६१ मध्ये तुटले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात इजिप्तने १९४८, १९५६, १९६७ आणि १९७३ मध्ये इस्रायलबरोबर सशस्त्र युद्ध केले. यामुळे इजिप्तला सामाजिक व धार्मिक कलह व राजकीय अस्थिरता पाहावी लागली. १९६७ पर्यंत गाझा पट्टी अधून मधून इजिप्तच्या ताब्यात होती. १९७८ मध्ये इजिप्तने कॅम्प डेव्हिड अ‍ॅकार्डवर स्वाक्षरी केली आणि गाझा पट्टीपासून अधिकृतपणे माघार घेत आहेत आणि इस्राईलला मान्यता दिली.

अलीकडील २०११ मधील क्रांती, त्यानंतरचा दहशतवाद आणि आर्थिक अस्थिरता, यासह राजकीय अशांतता यासारख्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले आहे. इजिप्तचे सध्याचे सरकार अध्यक्ष अब्देल फताह अल-सीसी यांच्या अध्यक्षतेखालील अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे. या सरकारचे हुकूमशाही म्हणून वर्णन केले जाते.

भूगोल

इजिप्त हा जगातील ३०वा सर्वात मोठा देश आहे. इजिप्तच्या उग्र वातावरणामुळेनाईल व्हॅली आणि डेल्टाच्या अरुंद भागात लोकसंख्या केंद्रित आहे. सुमारे ९९% लोकसंख्या एकूण भूभागाच्या ५.५% क्षेत्रात राहते.

इजिप्तच्या पश्चिमेस लिबिया, दक्षिणेस सुदान आणि पूर्वेस गाझा पट्टी व इस्त्राईलची सीमा आहे. भू-पॉलिटिक्समध्ये इजिप्तची महत्त्वपूर्ण भूमिका आहे कारण हा एक ट्रान्सकॉन्टिनेंटल राष्ट्र आहे. येथे आफ्रिका आणि आशिया दरम्यान एक लँड ब्रिज (सुएझचा इस्तॅमस) आहे. सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राच्या मार्गाने हिंदी महासागराला जोडतो.

नाईल व्हॅलीशिवाय इजिप्तचा बहुतांश लँडस्केप वाळवंटमय आहे. वाळवंटी वारा १०० फूटांपेक्षा जास्त उंचीचे प्रेक्षणीय वाळूचे टिडे तयार करतात. इजिप्तमध्ये सहारा वाळवंटातील काही भाग आणि लिबियन वाळवंटांचा समावेश आहे. या वाळवंटांनी फारोच्या राज्याचे पश्चिमेकडील धोक्यांपासून संरक्षण केले आणि त्यांना प्राचीन इजिप्तमध्ये “लाल जमीन” म्हणून संबोधले गेले.

शहरांमध्ये अलेक्झांड्रिया,अस्वान, अस्युत, कैरो, एल महल्ला, एल कुब्रा, गीझा (खुफूच्या पिरॅमिडचे स्थळ) हूर्घाडा, लक्सर, कोम ओम्बो, पोर्ट सफगा, पोर्ट सैद, शर्म एल शेख, सुएझ (जिथे सुएझ कालव्याचा दक्षिण टोकाचा भाग आहे), झगाझिग आणि मिनिया यांचा समावेश आहे. ओएसेसमध्ये बहेरिया, डाखला, फराफ्रा, खर्गा आणि सिवा यांचा समावेश आहे. प्रोटेक्टरेट्समध्ये रास मोहम्मद नॅशनल पार्क, झारॅनिक प्रोटेक्टरेट आणि सिवा यांचा समावेश आहे.

इजिप्त चा नकाशा

हवामान

हिवाळ्यातील महिन्यांमध्ये इजिप्तचा बहुतेक पाऊस पडतो. काइरोच्या दक्षिणेस, वर्षाकाठी सरासरी सुमारे २ ते ५ मिमी पाऊस पडतो आणि तो ही बर्‍याच वर्षांच्या अंतराने. उत्तर किनाऱ्याच्या अगदी अरुंद पट्टीवर पाऊस ४१० मिमी इतका जास्त असू शकतो, बहुधा ऑक्टोबर ते मार्च दरम्यान. सीनाईच्या पर्वतांवर आणि दामिएट्टा, बाल्टिम आणि सिदी बरानी यासारख्या काही किनारपट्टीवरील काही शहरांवर आणि अलेक्झांड्रियामध्ये क्वचितच बर्फ पडतो. कैरोवर १३ डिसेंबर २०१३ रोजी थोड्या प्रमाणात बर्फ पडला, बर्‍याच दशकांतील ही पहिलीच वेळ होती. इजिप्त हा जगातील सर्वाधिक सूर्यप्रकाशित देश आहे आणि त्याच्या बहुतेक भूमीवरील पृष्ठभाग वाळवंट आहे.

इजिप्तमध्ये विलक्षण उष्ण आणि कोरडे वातावरण आहे. उत्तरेकडील सरासरी तापमान जास्त असते परंतु उन्हाळ्यात देशाच्या उर्वरित भागात ते अत्यंत उच्च असते. उत्तरेकडील किनारपट्टीवर थंड भूमध्य वारे सातत्याने वाहतात, ज्यामुळे मध्यम तापमान मिळविण्यात मदत होते विशेषतः उन्हाळ्यात.

खमासीन हा गरम, कोरडा वारा आहे जो दक्षिणेकडील विशाल वाळवंटातून उगम पावतो आणि वसंत किंवा उन्हाळ्याच्या सुरूवातीस वाहतो. हा वारा वाळू आणि धूळ कण आणतो आणि सामान्यत: दिवसा तापमान ४०° आणि कधीकधी आतील भागात ५० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात होते. तर संबंधित आर्द्रता ५% किंवा त्याहून कमी होऊ शकते. इजिप्तमध्ये हवामान नेहमीच उष्ण आणि स्पष्ट असते, विशेषत: अस्वान, लक्सर आणि अस्युतसारख्या शहरांमध्ये. हे पृथ्वीवरील सर्वात कमी ढगाळ आणि कमीतकमी पावसाळी प्रदेशांपैकी एक आहे.

अर्थव्यवस्था

इजिप्तची अर्थव्यवस्था मुख्यत: शेती, मीडिया, पेट्रोलियम आयात, नैसर्गिक वायू आणि पर्यटन यावर अवलंबून आहे. तीस लाखाहून अधिक इजिप्शियन लोक प्रामुख्याने लिबिया, सौदी अरेबिया, पर्शियन आखात आणि युरोपमध्ये काम करतात. १९७० मध्ये अस्वान धरण पूर्ण झाल्याने आणि परिणामी इजिप्तच्या शेती व पर्यावरणामध्ये सुधार झाला. वेगाने वाढणारी लोकसंख्या, मर्यादित शेतीयोग्य जमीन आणि नाईल नदीवरील अवलंबन या सर्वांनी संसाधनांवर आणि अर्थव्यवस्थेवर ताण पडतो आहे.

संप्रेषण (कम्युनिकेशन) आणि भौतिक पायाभूत सुविधांमध्ये सरकारने गुंतवणूक केली आहे. इजिप्तला १९७९ पासून अमेरिकेस परदेशी मदत (फॉरेन एड) मिळते (दर वर्षी सरासरी २.२ अब्ज डॉलर्स). इजिप्त इराक युद्धानंतर अमेरिकेतून मिळणाऱ्या अशा प्रकारच्या रकमेचा तिसरा मोठा प्राप्तकर्ता आहे. इजिप्तची अर्थव्यवस्था प्रामुख्याने या स्त्रोतांवर अवलंबून असतेः पर्यटन, परदेशात काम करणाऱ्या इजिप्शियन लोकांकडील पैस्यांचे रेमीटेन्स आणि सुएझ कालव्याचे उत्पन्न.

लोक

इजिप्त हा मध्य पूर्वातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. २०१७ पर्यंत सुमारे ९५ दशलक्ष रहिवासी असलेला आफ्रिकन खंडावरील तिसरा सर्वाधिक लोकसंखेचा देश आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आणि कृषी उत्पादनात वाढ झाल्यामुळे त्याची लोकसंख्या १९७० ते २०१० पर्यंत झपाट्याने वाढली. १७९८ मध्ये नेपोलियनने जेव्हा देशावर आक्रमण केले तेव्हा इजिप्तची लोकसंख्या अंदाजे ३ दशलक्ष होती.

इजिप्तचे लोक अत्यंत शहरी बनले आहेत, ते नील नदीच्या काठावर (विशेषतः कैरो आणि अलेक्झांड्रिया) आणि सुएझ कालव्याजवळील भागात राहतात. जास्तीत जास्त इजिप्शियन लोक मुख्य शहरी केंद्रांमध्ये राहतात आणि ग्रामीण गावात राहणाऱ्या लोकांना फेल्लाहिन (शेतकरी) म्हणतात.

भाषा

इजिप्तची अधिकृत भाषा अरबी आहे. येथे बोलल्या जाणार्‍या भाषा या आहेत: इजिप्शियन अरबी (६८%), सायदी अरबी (२९%), पूर्व इजिप्शियन बेदावी अरबी (१.६%), सुदानी अरबी (०.६%), डोमारी (०.३%), नोबिन (0.३%), बेजा (०.१%), सिवी आणि इतर. याव्यतिरिक्त, ग्रीक, आर्मेनियन आणि इटालियन आणि अलीकडील काळात, अम्हारिक आणि तिग्रीग्ना यासारख्या आफ्रिकन भाषा ही स्थलांतरितांच्या मुख्य भाषा आहेत.

धर्म

इजिप्त हा मुख्यत: सुन्नी मुस्लिम देश आहे जो इस्लामचा राज्य धर्म आहे. इजिप्तमधील विविध धर्मांचे पालन करणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी हा एक वादग्रस्त विषय आहे. अंदाजे ८५-९०% मुस्लिम, १०-१५% कॉप्टिक ख्रिश्चन आणि १% इतर ख्रिस्ती संप्रदाय म्हणून ओळखले जातात.

७व्या शतकापूर्वी इजिप्त हा ख्रिश्चन देश होता आणि इस्लाम आल्यानंतर हळूहळू हा देश बहुसंख्यांक मुस्लिम देशात बनविला गेला.

Reference: Egypt

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment

1 Comment