देश भूगोल

इक्वेटोरीयल गिनी (Equatorial Guinea)

इक्वेटोरीयल गिनी Equatorial Guinea

इक्वेटोरियल गिनी, अधिकृतपणे रिपब्लिक ऑफ इक्वेटोरियल गिनी हा मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित देश आहे आणि त्याचे क्षेत्रफळ २८००० चौरस किलोमीटर आहे. हा देश अगोदर स्पॅनिश गिनिची वसाहत होता, स्वातंत्र्योत्तर नंतरचे नाव विषुववृताची जवळीक आणि गिनीचे आखात दर्शविते. इक्वेटोरीयल गिनी एकमेव सार्वभौम आफ्रिकन राज्य आहे ज्यात आजही स्पॅनिश अधिकृत भाषा आहे. २०१५ मध्ये देशाची अंदाजे लोकसंख्या १,२२२,२४५ होती.

इक्वेटोरीयल गिनीमध्ये दोन प्रमुख भाग आहेत, इन्सुलर आणि मुख्य भूप्रदेश. इन्सुलर प्रदेशात गिनीच्या आखातीमधील बायोको बेटांचा समावेश आहे आणि अ‍ॅनोबॉन, एक लहान ज्वालामुखी बेट जे विषुववृत्ताच्या दक्षिणेस देशाचा एकमेव भाग आहे. बायोको बेट इक्वेटोरियल गिनीचा सर्वात उत्तरेकडील भाग आहे आणि देशाची राजधानी मालाबो याच बेटावर आहे.

पोर्तुगीज बोलणारे बेट साओ टोमे आणि प्रिन्सेप बायोको आणि अ‍ॅनोबॉनच्या दरम्यान आहे. मुख्य भूप्रदेश, रिओ मुनिच्या उत्तरेस कॅमेरून आणि दक्षिण व पूर्वेस गॅबॉन देश आहेत. इक्वेटोरीयल गिनीतील सर्वात मोठे शहर बाटा आणि सिउदाद दे ला पाझ हे देशातील नियोजित आणि भविष्यातील राजधानी या भागात आहे. रिओ मुनीमध्ये कॉरीस्को, एलोबी ग्रान्डे आणि एलोबी चिकोसारख्या अनेक लहान ऑफशोअर बेटांचा देखील समावेश आहे. हा देश आफ्रिकन युनियन, फ्रान्सोफोनी, ओपेक आणि सीपीएलपीचा सदस्य आहे.

१९९० च्या मध्यापासून इक्वेटोरियल गिनी हा उप-सहारा आफ्रिकेतील सर्वात मोठा तेल उत्पादक बनला आहे. याची जीडीपी दरडोई पीपीपीसाठी अड्जस्ट केल्या नंतर जगातील ४३ व्या क्रमांकावर आहे. तथापि, संपत्ती अत्यंत असमानपणे वितरित केली गेली आहे, तेल मायनिंग चा पैसा फक्त काही श्रीमंत आणि राजकारणी लोकांच्या खिशात जातो. २०१६च्या मानव विकास निर्देशांकात देश १३५ व्या क्रमांकावर आहे. निम्म्याहून कमी लोकसंख्येस शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळते आणि २०% मुले पाच वर्षापूर्वीच मरत आहेत.

इक्वेटोरियल गिनी मध्ये हुकूमशाही सरकार आहे आणि इथे जगातील सर्वात वाईट मानवाधिकार उल्लंघनाची नोंद आहे. रिपोर्टर विथआऊट बॉर्डर्सने इक्वेटोरियल गिनी चे अध्यक्ष तेओडोरो ओबियांग निगमा माबासोगो यांना प्रेस स्वातंत्र्याच्या “शिकारी” म्हटले आहे. मानवी तस्करी ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे.

भूगोल

इक्वेटोरीयल गिनी मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित देश आहे. या देशात मुख्य भूप्रदेश, रिओ मुनि आहे, ज्याच्या उत्तरेस कॅमेरून आणि पूर्वे व दक्षिणेस गॅबॉन आणि पाच लहान बेटे, बायोको, कोरीस्को, अ‍ॅनोबॉन, एलोबी चिको आणि एलोबी ग्रान्दे आहेत. बायोको, मालाबो कॅमरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. अ‍ॅनोबॉन बेट गॅबॉनमधील केप लोपेझच्या पश्चिम – दक्षिणेस सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर आहे. कॉरिस्को आणि दोन एलोबी बेटे रिओ मुनि आणि गॅबॉनच्या सीमेवर असलेल्या कोरिस्को बे येथे आहेत. इक्वेटोरीयल (विषुववृत्तीय) गिनी नाव असूनही, देशाच्या कोणताही भाग भूमध्यरेखेवर (विषुववृत्तावर) नाही. काही बेटे सोडल्यास देशाचा सर्व भूभाग उत्तर गोलार्धात आहे.

इक्वेटोरीयल गिनी चा नकाशा

हवामान

इक्वेटोरीयल गिनी मध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान, रिओ मुनि कोरडे आणि बायोको ओले असते आणि डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उलट असते. पाऊस किंवा धुके दररोज अ‍ॅनोबॅनवर असते, जिथे ढगविरहित दिवस कधीच नोंदविला गेला नाही. मालाबो, बायोको येथे सरासरी तापमान १६ डिग्री सेल्सिअस ते ३३ डिग्री सेल्सियस पर्यंत असते. रिओ मुनि मध्ये, सरासरी तापमान २७ डिग्री सेल्सियस असते. वार्षिक पर्जन्यमान मालाबो येथे १९३० मिमी आणि उरेका, बायोको येथे १०९२० मिमी पर्यंत असते, परंतु रिओ मुनि प्रदेश शक्यतो कोरडा असतो.

पर्यावरण

इक्वेटोरीयल गिनी मध्ये विविध पर्यावरणीय प्रदेश आहेत. किनारपट्टीवरील मध्य आफ्रिकन मॅंग्रोव्हचे काही भाग वगळता रिओ मुनि प्रदेश अटलांटिक इक्वेटोरियल किनारपट्टीच्या जंगलांच्या प्रदेशात येतो. क्रॉस-सनागा-बायोको किनारपट्टीवरील जंगल प्रदेशात बायोको चा खूप सारा भाग, कॅमेरून आणि नायजेरियाच्या जवळचे भाग येतात. माउंट कॅमरून आणि बायोको मॉन्टेन वन जंगल प्रदेशामध्ये बायोको आणि जवळील माउंट कॅमेरूनच्या उच्च भूभागाचा समावेश आहे. साओ टोमे, प्रिन्सेप आणि अ‍ॅनोबॅन ओलसर तळ जंगल सर्व अ‍ॅनोबॅन, तसेच साओ टोमे आणि प्रिन्सिपेला व्यापून टाकते.

लोक

इक्वेटोरियल गिनी मधील बहुतेक लोक बंटू वंशाचे आहेत. सर्वात मोठा वांशिक गट, फॅंग हा मुख्य भूमीवरील मूळ निवासी आहेत. संपूर्ण लोकसंख्येपैकी ८०% लोक फॅन वंशाचे आहेत आणि त्यांत सुमारे ६७ कुळांचा समावेश आहे. रिओ मुनिच्या उत्तरेकडील भागातील लोक फांग-नतमु बोलतात तर दक्षिणेकडे फॅंग-ओका बोलतात. दोन बोलींमध्ये फरक आहे परंतु परस्पर सुगम आहेत. शेजारच्या कॅमरून (बुलू) आणि गॅबॉनच्या काही भागात फॅनच्या काही बोली बोलल्या जातात. लोकसंख्येच्या १५% असलेले बुबी लोक हे बायोको बेटाचे मूळ निवासी आहेत. फॅंग आणि अंतर्देशीय वंशीय गटांमधील पारंपारिक सीमांकन रेखा बाटाच्या पूर्वेस निफांग गावामध्ये आहे.

भाषा

स्पॅनिश आणि फ्रेंच अनेक वर्षांपासून अधिकृत भाषा होत्या. २०१० मध्ये पोर्तुगीजला अधिकृत भाषा म्हणूनही स्वीकारले गेले. १८४४ पासून स्पॅनिश ही अधिकृत भाषा आहे. अद्याप ही शिक्षण आणि प्रशासनाची स्पॅनिश भाषा वापरली जाते. विषुववृत्तीय गिनी लोकांपैकी ६७.६% हे स्पॅनिश बोलू शकतात, विशेषत: राजधानी, मालाबोमध्ये राहणारे लोक. फक्त फ्रान्सोफोनीमध्ये सामील होण्यासाठी फ्रेंचला अधिकृत भाषा म्हणून सामील केले गेले होते, फ्रेंच काही सीमावर्ती शहरे वगळता हे स्थानिक पातळीवर बोलली जात नाही.

आदिवासी/देशी भाषा ही राष्ट्रीय संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जातात. देशी भाषांमध्ये फॅंग, बुबे, बेंगा, एनडो, बालेन्गु, बुजेबा, बिसिओ, गुमु, इग्बो, पिचिंगलिस, फा डी अम्बे आणि जवळजवळ नामशेष झालेल्या बास्के यांचा समावेश आहे. बहुतेक आफ्रिकन वंशीय गट बंटू भाषा बोलतात.

धर्म

इक्वेटोरीयल गिनीचे ९३% लोक ख्रिस्ती धर्म पाळतात. यामध्ये रोमन कॅथोलिक बहुसंख्य आहेत (८८%), तर अल्पसंख्याक प्रोटेस्टंट आहेत (५%). २% लोक इस्लामचा (मुख्यत: सुन्नी) अनुसरण करतात. उर्वरित ५% अ‍ॅनिझम, बहिश्थ आणि इतर धर्म मानतात.

Reference: Equatorial Guinea

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.