देश भूगोल

इथिओपिया (Ethiopia)

इथिओपिया Information about Ethiopia in Marathi
wikimedia

इथिओपिया, अधिकृतपणे फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया हा आफ्रिकेच्या उत्तर-पूर्व भागातील एक देश आहे. याच्या उत्तरेस इरीट्रिया, ईशान्य दिशेस जीबौती, पूर्वेस सोमालँड व सोमालियाचे दक्षिणेकडील राज्य, दक्षिणेस केनिया, पश्चिमेस दक्षिण सुदान आणि वायव्येकडे सुदान यांच्या सीमा आहेत. १०२ दशलक्षाहून अधिक रहिवासी असलेल्या इथिओपिया हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला लँडलॉक्ड आणि आफ्रिका खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. एकूण क्षेत्रफळ ११००००० चौरस किलोमीटर आहे. इथिओपिया ची राजधानी आणि सर्वात मोठे शहर अदिस अबाबा आहे.

आधुनिक मानवांच्या सांगाड्यांचे बरेच पुरावे (जीवाष्म) इथिओपियामध्ये सापडले आहेत. असे मानले जाते कि आधुनिक मानव प्रथम मध्य पूर्व आणि त्यापलीकडे प्रवास करण्यासाठी इथूनच निघाले. भाषाशास्त्रज्ञांच्या मते, प्रथम अफ्रॉसिएटिक-भाषिक लोकसंख्या नियोलिथिक युगात आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशात स्थायिक झाली.

मौखिक साहित्य सांगते की राजेशाहीची स्थापना शबाच्या राणीच्या सोलोमन राजवंशाने त्याच्या पहिल्या राजा, मेनेलिक प्रथमच्या काळात केली होती. पहिल्या शतकांत, अक्समच्या राज्याने त्या प्रदेशात एकसंघ्य सभ्यता उभारली त्यानंतर इथिओपियन साम्राज्य प्रस्तापित झाले.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आफ्रिकन स्क्रॅम्बल दरम्यान इथिओपिया आणि लाइबेरिया ही दोन राष्ट्रे होती ज्यांनी युरोपियन वसाहतवादी शक्तीपासून आणि दीर्घकालीन वसाहतवादापासून आपले सार्वभौमत्व जपले. तथापि, १९३६ मध्ये इटलीने हा देश ताब्यात घेतला आणि दुसर्‍या महायुद्धात मुक्त होईपर्यंत इटालियन इथिओपिया बनला.

इटालियन राजवटीदरम्यान, देशातील गुलामगिरी संपुष्टात आली आणि शहरीकरण निरंतर वाढले. १९७४ मध्ये, हॅले सेलासी अंतर्गत इथिओपियन राजशाही डेरगने उधळली जे सोव्हिएत युनियनच्या समर्थीत कम्युनिस्ट लष्करी सरकार होते. १९८७ मध्ये, डर्गने इथिओपियातील पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकची स्थापना केली. परंतु इथिओपियन पीपल्स रेव्होल्यूशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटने १९९१ मध्ये ही सत्ता उलथून टाकली आणि तेव्हापासून ते सत्ताधारी आहेत.

इथिओपिया आणि एरिट्रिया प्राचीन गीझ लिपी वापरतात, जी जगात अजूनही वापरल्या जाणार्‍या सर्वात जुन्या वर्णमालांपैकी एक आहे. इथिओपियन कॅलेंडर, जे ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जवळपास सात वर्षे आणि तीन महिन्यांच्या मागे आहे, बोराणा कॅलेंडरच्या बरोबरच अस्तित्वात आहे. बहुसंख्य लोक ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. अक्समचे ऐतिहासिक राज्य ख्रिस्ती धर्म अधिकृतपणे स्वीकारणारे पहिले राज्य होते. जवळजवळ एक तृतीयांश इस्लाम धर्म (मुख्यतः सुन्नी) पाळतात.

इथियोपिया मधील नेगाश येथे आफ्रिकेतील सर्वात जुनी मुस्लिम वस्ती आहे. बेटे इस्त्राईल या नावाने ओळखल्या जाणार्‍या इथिओपियन यहुद्यांची मुबलक लोकसंख्याही १९८० च्या दशकात इथिओपियातच राहिली. इथिओपिया हे बहुभाषिक राष्ट्र असून जवळजवळ ८० जातीय गट आहेत, त्यातील चार सर्वात मोठे ऑरोमो, अमहरा, सोमाली आणि तिग्रीयन आहेत. देशातील बहुतेक लोक कुशीटिक किंवा सेमेटिक भाषा बोलतात.

याव्यतिरिक्त, ओमोटिक भाषा दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या अल्पसंख्यक गटांद्वारे बोलल्या जातात. निलो-सहारन भाषा देशातील निलोटिक वांशिक अल्पसंख्यक बोलतात. मूळ भाषिकांद्वारे ऑरोमो ही सर्वाधिक लोकप्रिय भाषा आहे. एकूण भाषिकांच्या संख्येने अम्हारिक सर्वाधिक जास्त वापरली बोलली जाते आणि सरकारी कामकाजासाठी देखील अम्हारिक भाषा वापरतात.

इथियोपिया नैसर्गिक विरोधाभासांची जमीन आहे. पश्चिम भागात विपुल सुपीक जमीन, जंगले आणि असंख्य नद्या आहेत आणि उत्तरेकडे जगातील सर्वात उच्च-तापमानाची डॅलॉल वस्ती आहे. इथिओपियन हाईलँड्स हे आफ्रिकेतील सर्वात मोठी पर्वतरांगा आहेत आणि सोफ ओमर लेणींमध्ये खंडातील सर्वात मोठी गुहा आहे. आफ्रिकेत इथिओपियात युनेस्कोच्या सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ आहेत. याव्यतिरिक्त, ते यूएन, जी-२४, जी-७७ आणि ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीचे संस्थापक सदस्य आहेत.

एडिस अबाबा हे आफ्रिकन युनियन, पॅन आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, संयुक्त राष्ट्रांचे आफ्रिकेचे आर्थिक कमिशन, आफ्रिकन स्टँडबाय फोर्स आणि आफ्रिकेवर केंद्रित असलेल्या अनेक जागतिक स्वयंसेवी संस्थांचे मुख्यालय आहे.१९७० आणि १९८० च्या दशकात इथिओपियामध्ये नागरी संघर्ष आणि कम्युनिस्ट शुद्धीच्या प्रसंगामुळे अर्थव्यवस्था कमजोर झाली. त्यानंतर देशाची पुनर्रचना झाली आहे आणि आता पूर्व आफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था (जीडीपीनुसार) म्हणून इथियोपिया प्रसिदध आहे.

इथियोपिया चा नकाशा

Reference: Ethiopia

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment

1 Comment

  • With havin so much content and articles do you ever run into any issues of plagorism or copyright infringement? My blog has a lot of unique content I’ve either created myself or outsourced but it appears a lot of it is popping it up all over the internet without my authorization. Do you know any techniques to help prevent content from being stolen? I’d genuinely appreciate it.