सार्वजनिक व्यक्तिमत्व लोक

ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg)

ग्रेटा थनबर्ग Greta Thunberg information in Marathi
CNN.com

ग्रेटा थनबर्ग ही एक क्लायमेट चेंज वरील स्वीडिश पर्यावरणवादी आहे जिच्या प्रचाराला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. ग्रेटा थनबर्ग चा जन्म 3 जानेवारी 2003 ला झाला आहे.

वयाच्या पंधराव्या वर्षी ऑगस्ट 2018 मध्ये ती शाळा सोडून स्वीडिश पार्लमेंटच्या समोर प्रदर्शन करत असे. हातामध्ये “स्कुल स्ट्राईक फॉर क्लायमेट” असे फलक घेऊन ती क्लायमेट चेंज वर योग्य कारवाई करण्याची मागणी करत होती. हे पाहून इतर विद्यार्थ्यांनीही ही आपापल्या कम्युनिटी मध्ये असे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. “फ्रायडे फॉर फ्युचर” नावाच्या चळवली खाली त्यांनी स्कूल क्लायमेट स्ट्राइक चे प्रदर्शन खूप ठिकाणी केले. ग्रेटा थनबर्गने 2018 मध्ये युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स मध्ये भाषण दिले, याची प्रेरणा घेऊन जगभरात कुठे ना कुठे दर आठवड्याला क्लायमेट चेंज विषयावर विद्यार्थ्यांची प्रदर्शने झाली. 2019 मध्ये दोन मोठी प्रदर्शने झाली ज्यामध्ये प्रत्येकी 10 लाखाहून ही जास्त विद्यार्थी सामील झाले.

ग्रेटा थनबर्ग ही तिच्या बोथट आणि मुद्देसूद बोलणीसाठी प्रसिद्ध झाली आहे, मग ते सार्वजनिक ठिकाण असू देत, राजकीय नेते किंवा कुठली असेंबली ती नेहमी आपल्या पद्धतीनेच बोलते. ती आपल्या भाषणांमध्ये क्लायमेट चेंज वर त्वरित उपचारांची मागणी करते. कार्बन फूटप्रिंट किंवा कार्बन पदचिन्ह कमी करण्यासाठी थनबर्ग ने आपल्या आई-वडिलांनाही जीवनशैलीमध्ये काही बदल करायला लावले जसे की विमानाचा प्रवास न करणे आणि मांस न खाणे.

अचानक मिळालेल्या जागतिक प्रसिद्धीमुळे तिच्याकडे एक भावी नेता म्हणून पाहिले जात आहे पण त्यासोबतच ती क्रिटिक्सच्या विरोधाचे लक्षही बनली आहे. मे 2019 मध्ये ग्रेटा टाईम मॅगझीनच्या कव्हरपेजवर फिचर झाली होती, तिला तिथे “नेक्स्ट जनरेशन लीडर” असे बोलले गेले. ग्रेटा थनबर्ग ची स्कूल स्ट्राइक चळवळ व्हाईस डॉक्युमेंट्री या चैनल वरती सुद्धा प्रकाशित झाली, त्या डॉक्युमेंटरी चे नाव “मेक द वर्ल्ड ग्रेटा अगेन” असे होते. काही मीडिया हाऊसेस ने ग्रेटाच्या इम्पॅक्टला “द ग्रेटा थनबर्ग इफेक्ट” असेही बोलले आहे.

रॉयल स्कॉटिश जिओग्राफिकल सोसायटीच्या फेलोशिपसहित थनबर्ग असंख्य सन्मान व पुरस्कारांचे मानकरी ठरली आहे. टाइम मासिकाने तिला २०१९ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आहे. तिला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये तिने न्यूयॉर्कमधील यूएन क्लायमेट ऍक्शन समिटला संबोधित केले.

जीवन

ग्रेटा थनबर्गचा जन्म ३ जानेवारी २००३ रोजी स्टॉकहोम मध्ये झाला. ती ओपेरा गायिका मालेना एर्नमन आणि अभिनेता स्वांते थुनबर्ग यांची मुलगी आहे. तिचे आजोबा अभिनेते आणि दिग्दर्शक ऑलोफ थनबर्ग आहेत.

ग्रेटा सांगते की तिने ८ वर्षांची असताना, २०११ मध्ये प्रथमच हवामान बदलाविषयी (क्लायमेट चेंज) ऐकले होते. तीन वर्षांनंतर ती उदास, सुस्त राहायला लागली, तिने खाणेपिणे, बोलणे सोडले. अस्पर्गर सिंड्रोम, ओबॅसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) आणि सिलेक्टिव्ह म्युटिजमचे चा आजार तिला झाला होता.

सुमारे दोन वर्ष, थनबर्गने तिच्या पालकांना शाकाहारी बनून आणि विमान प्रवास सोडून देऊन कुटुंबाचे कार्बन पदचिन्ह कमी करण्याचे आव्हान केले. तिच्या आईला ओपेरा गायक म्हणून आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सोडावी लागली. तिच्या आईवडिलांचा प्रतिसाद आणि जीवनशैलीतील बदलांनी तिला विश्वास मिळाला कि जगात बदल घडवू शकते. तिची कौटुंबिक कथा “सीन्स फ्रॉम हार्ट “या पुस्तकात 2018 मध्ये सांगितली गेली आहे.

ग्रेटा इफेक्ट

तिच्या कामाद्वारे थनबर्गने तिच्या वयोगटातील अनेक विद्यार्थ्याना प्रेरणा दिली, याचे “ग्रेटा प्रभाव” असे वर्णन केले गेले आहे. तिच्या या स्पष्ट बोलण्याच्या भूमिकेला उत्तर म्हणून विविध राजकारण्यांनीही हवामान बदलावर लक्ष देण्याची गरज मान्य केली आहे.

ब्रिटनचे पर्यावरण विषयक सचिव मायकेल गोव्ह म्हणाले: “जेव्हा मी तुझे भाषण ऐकले तेव्हा मला खूप कौतुक वाटले आणि दोषी असल्यासारखे देखील वाटले. मी तुमच्या पालकांच्या पिढीचा आहे आणि मी जाणतो की आम्ही हवामान बदल आणि आम्ही स्वतः निर्माण करण्यात मदत केलेले व्यापक पर्यावरणीय संकटे संबोधण्यासाठी पुरेसे काहीही केले नाही”

हवामान बदल कायदा २००८ लागू करण्यास जबाबदार असलेले कामगार राजकारणी एड मिलिबँड म्हणाले: “तु आम्हाला जागे केले आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. संपावर गेलेल्या सर्व तरुणांनी आपल्या समाजा समोर आरसा धरला आहे. तुम्ही आम्हा सर्वांना खरोखर महत्त्वाचा धडा शिकवलात आहात”.

ऑगस्ट २०१९ मध्ये, पर्यावरणासंबंधीच्या मुलांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि खप वाढला, प्रकाशकांनी त्याचे श्रेय “ग्रेटा थनबर्ग इफेक्ट” ला दिले आहे. थनबर्गपासून प्रेरित होऊन अमेरिकेच्या श्रीमंत परोपकारी आणि गुंतवणूकदारांनी हवामान आपत्कालीन निधी स्थापन करण्यासाठी जवळजवळ अर्धा दशलक्ष पौंड दान केले आहेत.

Sources:
Greta Thunberg

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.