देश भूगोल

गिनी-बिसाउ (Guinea-Bissau)

गिनी-बिसाउ Information about Guinea-Bissau
wikipedia

गिनी-बिसाउ, अधिकृतपणे गिनी-बिसाउ रिपब्लिक, हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याचे क्षेत्रफळ ३६१२५ चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या अंदाजे १८१५६९८ आहे.

गिनी-बिसाउ एकेकाळी गबूच्या राज्याचा भाग होता, तसेच माली साम्राज्याचाही भाग होता. या राज्याचे काही भाग १८व्या शतकापर्यंत टिकून राहिले आणि काही १६व्या शतकापासून पोर्तुगीझ वसाहतीमध्ये होते. १९व्या शतकात याची पोर्तुगीज गिनी वसाहत बनवली गेली. १९७३ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याची राजधानी बिसाऊ चे नाव देशाच्या नावात जोडण्यात आले. गिनी (पूर्वी फ्रेंच गिनी) सह नावाचा गोंधळ रोखण्यासाठी असे करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउला राजकीय अस्थिरतेचा इतिहास आहे आणि केवळ एका निवडून आलेल्या राष्ट्रपतींनी (जोसे मुरिओ वाज) पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडला आहे.

केवळ १४% लोक नॉन क्रिओलाइज्ड पोर्तुगीज बोलतात. पोर्तुगीज क्रिओल ही अधिकृत आणि राष्ट्रीय भाषा दोन्ही म्हणून स्थापित आहे. ती निम्म्या लोकसंख्येद्वारे (४४%) बोलले जाते आणि त्याहूनही जास्त ती दुसर्‍या भाषेच्या रूपात बोलली जाते. उर्वरित लोक विविध आफ्रिकन भाषा बोलतात.

गिनी-बिसाउ मध्ये विविध धर्म आहेत ज्यात कोणत्याही एका धर्माचे बहुमत नाही. तेथे सुमारे ४०% मुस्लिम, २२% ख्रिश्चन, १५% अ‍ॅनिमिस्ट आणि १८% अनिर्दिष्ट किंवा इतर आहेत. देशातील दरडोई जीडीपी जगातील सर्वात कमी आहे.

गिनी-बिसाउ युनायटेड नेशन्स, आफ्रिकन युनियन, वेस्ट आफ्रिकन स्टेट्सची इकॉनॉमिक कम्युनिटी, इस्लामिक कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, पोर्तुगीज भाषेतील देशांचे समुदाय, ला फ्रान्सोफोनी आणि दक्षिण अटलांटिक पीस अँड कोऑपरेशन झोनचे सदस्य आहेत.

समाज

लोक

२०१७ मध्ये गिनी-बिसाउची लोकसंख्या १८१५६९८ होती, तर १९५० मध्ये ५१८००० इतकी होती. २०१० मध्ये १५वर्षांखालील लोकसंख्येचे प्रमाण ४१.३% होते, १५ ते ६५ वयोगटात ५५.४ % होते तर 3.3% लोक ६५ वर्ष वयोगटातील किंवा त्याहून वृद्ध होते.

वांशिक गट

गिनी-बिसाउची लोकसंख्या वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे आणि इथे बर्‍याच वेगळ्या भाषा, रूढी आणि सामाजिक संरचना आहेत. बिसाऊ-गिनियांना खालील वंशीय गटात विभागले जाऊ शकते:

  1. लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग असलेले आणि उत्तर आणि ईशान्य दिशेला राहणारे फुला आणि मँडिंका भाषिक लोक
  2. दक्षिणेकडील किनारपट्टी भागात राहणारे बलंता आणि पापेल लोक
  3. मध्य आणि उत्तर किनारपट्टीच्या भागावर राहणारे मांजाको आणि मँन्चा.
  4. उर्वरित बहुतेक कॅप व्हर्डीयन अल्पसंख्यांकासह मिश्र पोर्तुगीज आणि आफ्रिकन वंशाचे मेस्टीयो आहेत.

देशात पोर्तुगीज मूळचे लोक बिसाऊ-गिनियन्सच्या तुलनेत अगदी कमी आहेत. गिनी-बिसाउला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतेक पोर्तुगीज नागरिकांनी देश सोडला. इथे काही चिनी लोकही राहतात, यात पूर्वीच्या आशियाई पोर्तुगीज वसाहत असलेल्या मकाऊ येथील मिश्र पोर्तुगीज आणि चिनी वंशाचे व्यापारी यांचा समावेश आहे.

भाषा

हा एक छोटासा देश असूनही गिनी-बिसाउमध्ये अनेक जातीय गट आहेत ज्यांनी स्वत:ची संस्कृती आणि भाषा जपली आहे. वसाहतवादामुळे या प्रदेशात पोर्तुगीज आणि पोर्तुगीज क्रिओल भाषा आली.

स्वातंत्र्यानंतर गिनिया-बिसाऊ ची राष्ट्रीय भाषा म्हणून ओळखली जात असली तरी, मानक (स्टॅंडर्ड) पोर्तुगीज ही मुख्यतः द्वितीय भाषा म्हणून बोलली जाते. स्टॅंडर्ड पोर्तुगीज काही मूळ भाषिकांसह, बर्‍याचदा बौद्धिक आणि राजकीय वर्गात मर्यादित आहे. औपनिवेशिक राज्याचा वारसा म्हणून ही सरकार आणि राष्ट्रीय दळणवळणाची भाषा आहे.

पोर्तुगीज ही एकच अधिकृत भाषा आहे. प्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंतचे शिक्षण पोर्तुगीज भाषेत केले जाते. केवळ ६७% मुलांना औपचारिक शिक्षणाची सुविधा मिळते. पोर्तुगीज भाषिकांची संख्या ११ ते १५% पर्यंत आहे. ४४% लोक पोर्तुगीज क्रिओल बोलतात. क्रेओल अद्याप विस्तारत आहे आणि बहुसंख्य लोकांना हि भाषा समजते. उर्वरित ग्रामीण लोकसंख्या वेगवेगळ्या मूळ आफ्रिकन भाषा बोलतात जसे: फूला, बलंता, मंडिंगा, मांजाको, पापेल, फेलुपे, बीफाडा, बीजगा आणि नलू.

भूगोल

गिनिया-बिसाऊ उत्तरेस सेनेगल व दक्षिणेस व पूर्वेस गिनी व त्याच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे.

याचे क्षेत्रफळ ३६१२५ चौरस किलोमीटरवर आहे जे तैवान किंवा बेल्जियमपेक्षा थोडे मोठे आहे. हा प्रदेश कमी उंचीवर आहे; त्याचा सर्वोच्च बिंदू फक्त ३०० उंच मीटर आहे. सागरी किनारपट्टी वरील भूभाग मॅन्ग्रोव्ह जंगलाचा आणि दलदलीचा आहे. पाऊस हा सहारामधून वाहणार्‍या उष्ण, कोरड्या हर्मातन वाऱ्यासह बदलतो. बीजागोस द्वीपसमूह मुख्य भूमीपासून दूर आहे.

गिनी-बिसाउ चा नकाशा

Reference: Guinea-Bissau
Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.