प्रदेश भूगोल

खंड (Continent)

खंड Information about Continent in Marathi
wikimedia (AlexCovarrubias)

समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. कोणत्याही कठोर मोजमापांऐवजी खंड कॅव्हेशन मध्ये ठरवले जातात. युरोप आणि आशिया सोडल्यास सर्व खंड चारही बाजूने महासागराने वेढले आहेत. सामान्यतः सात प्रदेश खंड म्हणून ओळखले जातात. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठ्या ते छोट्या क्रमांकाचे खंड: आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. खंडांमधील पहिला फरक प्राचीन ग्रीक नाविकांनी केला होता ज्यांनी एजियन समुद्राच्या जलमार्गाच्या दोन्ही बाजूंच्या देशांना युरोप आणि एशिया अशी नावे दिली होती.

भौगोलिकदृष्ट्या, खंड मोठ्या प्रमाणात कॉन्टिनेंटल क्रस्ट वर अवलंबून असतात जो कॉन्टिनेंटल प्लेट्स चा भाग असतो. कॉन्टिनेन्टल क्रस्टचे काही भाग पाण्यात बुडालेले सुद्धा असतात ते सहसा नियमित खंडांच्या सूचीमध्ये समाविष्ट केलेले नसतात, झीलॅंडिंया असा एक खंड आहे. बेटे बहुतेकदा शेजारच्या खंडासह गटबद्ध केली जातात. प्रशांत महासागरातील बहुतेक बेट देश आणि प्रदेश ऑस्ट्रेलिया खंडासोबत जोडले जातात आणि या भौगोलिक-राजकीय क्षेत्राला ओशिनिया नाव दिले गेले आहे.

उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना सात खंडांच्या मॉडेलमध्ये स्वतंत्र खंड म्हणून मानले जाते. तथापि, त्यांना अमेरिका किंवा अमेरिकास म्हणून देखील ओळखले जाते. दुसर्‍या महायुद्धापर्यंत अमेरिकेत हा दृष्टिकोन सामान्य होता आणि काही आशियाई सहा खंडातील मॉडेल्समध्ये अजूनही प्रचलित आहे. लॅटिन अमेरिकन देशांमध्ये, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली, ग्रीस आणि हंगेरीमध्ये ही एक सामान्य दृष्टी आहे तिथे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडांना एकाच मानले जाते.

युरोप आणि आशियाच्या बाबतीत सलग लँडमासचा निकष पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे. हे दोन्ही प्रदेश एकसंध असूनही याना दोन खंडांमध्ये विभाजले आहे. जर खंडांची कठोरपणे स्वतंत्र लँडमासेस म्हणून व्याख्या वापरली तर आफ्रिका, आशिया आणि युरोप मिळून एकच खंड तयार झाला असता, ज्याला अफ्रो-यूरेशिया म्हणून संबोधले जाऊ शकते. चार खंडांचा मॉडेल मध्ये आफ्रो-युरेशिया, अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश केला गेलेला आहे.

विविध खंड व्यवस्था

 • सात खंड
  आशिया – आफ्रिका – ऑस्ट्रेलिया – अंटार्क्टिका – युरोप – उत्तर अमेरिका – दक्षिण अमेरिका
  आशिया – आफ्रिका – ओशनिया – अंटार्क्टिका – युरोप – उत्तर अमेरिका – दक्षिण अमेरिका
 • सहा खंड
  आफ्रिका – अंटार्क्टिका – ओशनिया – युरेशिया – उत्तर अमेरिका – दक्षिण अमेरिका
  आफ्रिका – अमेरिका – अंटार्क्टिका – आशिया – ओशनिया – युरोप
 • पाच खंड
  आफ्रिका – अमेरिका – ओशनिया – अंटार्क्टिका – युरेशिया
  आफ्रिका – अमेरिका – ओशनिया – युरोप – एशिया
 • चार खंड
  अमेरिका – ओशनिया – अंटार्क्टिका – युराफ्रिशिया

सात खंडातील मॉडेल सहसा युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि पश्चिम युरोपच्या काही भागांसह बर्‍याच इंग्रजी भाषिक देशांमध्ये शिकवले जाते.

सहा खंडांचा संयुक्त-युरेशिया मॉडेल मुख्यतः रशिया, पूर्व युरोप आणि जपानमध्ये वापरला जातो. सहा खंडांचा संयुक्त-अमेरिका मॉडेल बर्‍याचदा स्पेन, लॅटिन अमेरिका, ग्रीस, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इटली आणि रोमानियामध्ये वापरला जातो. पाच खंडांचा मॉडेल मधून अंटार्क्टिकाला वगळले जाते कारण ते निर्जन आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि ऑलिम्पिक ध्वजाच्या वर्णनात पाच खंडांचा मॉडेलचा वापर केला जातो.

इतर विभाग

सुपरकॉन्टिनेंट्स

पारंपारिकपणे ज्ञात खंड सोडले तर खंडांची शब्दांची आणि अर्थ भिन्न आहेत. सुपरकॉन्टिनेंट्स म्हणजे असे भूभाग ज्यात एकापेक्षा जास्त क्रेटॉन किंवा कॉन्टिनेन्टल कोर असतात. यामध्ये लॉरसिया, गोंडवाना, वालबारा, केनोर्लँड, कोलंबिया, रॉडिनिया, पेंगिया यांचा समावेश आहे. कालांतराने, या सुपरकॉन्टिनेंट्सचे तुकडे होऊन सध्याच्या खंडांची निर्मिती झाली.

उपखंड (सबकॉन्टिनेन्ट)

खंडांचे काही भाग उपखंड म्हणून ओळखले जातात. सर्वात उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे भारतीय उपखंड आणि अरबी द्वीपकल्प. दक्षिण अमेरिकेचा दक्षिणी शंकू आणि उत्तर अमेरिकेचा अलास्का प्रायद्वीप यांनाही उपखंड मानले जाते. यापैकी बर्‍याच प्रकरणांमध्ये संबंधित “सबकॉन्टिनेंट्स” उर्वरित खंडातील वेगवेगळ्या टेक्टोनिक प्लेट्सवर आहेत. ग्रीनलँड, सामान्यत: जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते आणि कधी कधी उपखंड म्हणून ओळखले जाते. जर अमेरिकेला एकच खंड म्हणून पाहिले गेले तर ते दोन उपखंडात (उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका) किंवा तीन (मध्य अमेरिकेसह) मध्ये विभागले जाऊ शकतात. जेव्हा युरेशिया हा एकच खंड मानला जातो तेव्हा युरोप हा उपखंड म्हणून मानला जातो.

बुडलेले खंड

कॉन्टिनेन्टल क्रस्टचे काही भाग मोठ्या प्रमाणात समुद्राने व्यापलेले आहेत आणि अश्या भागांना बुडलेले खंड मानले जाते. प्रामुख्याने न्यूझीलंडचे झीलँडिया, न्यू कॅलेडोनिया आणि दक्षिण हिंद महासागरामधील जवळजवळ पूर्णपणे बुडलेले केरेग्लेन पठार.

मायक्रोकॉन्टिनेंट्स

लाखो वर्षणाच्या प्रक्रिये मध्ये काही भूभाग मूळ खंडापासून तुटून दूर वाहत गेले आहेत. तुलनेने लहान असल्याने त्यांना मायक्रोकॉन्टिनेंट महणाले जाऊ शकते. मादागास्कर याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. सहसा याला आफ्रिकेचे बेट मानले जाते, परंतु त्याच्या भिन्न उत्क्रांतीमुळे त्याला जैविक दृष्टीकोनातून “आठवा खंड” म्हणून संबोधले गेले आहे.

Reference: Continent

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment