चित्रपट

नाळ (चित्रपट)

Information about naal marathi movie

नाळ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला, सुधाकर रेड्डी याकांती दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे निर्मित मराठी चित्रपट आहे. ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये या चित्रपटाने दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट श्रेणीत सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला. नाळ हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्याचे सुंदर वर्णन करतो. आपली जन्मदाती आई आणि वाढवणारी आई ह्या वेगळ्या आहेत हे कळल्यावर लहानग्या, खोडकर चैत्याच्या मनातील चलबिचल या चित्रपटात सुंदर रित्या टिपली आहे. या चित्रपटाचे दिगदर्शक सुधाकर रेड्डी याकांती यांनी नागराज मंजुळे सोबत सैराट चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे.

नाळ चित्रपट हा चैतन्य नावाच्या आठ वर्षांच्या छोट्या मुलाची कहाणी आहे. महाराष्ट्रातल्या दुर्गम गावात राहणाऱ्या एक जमीनदार आणि प्रेमळ व काळजीवाहू आईचा मुलगा. नाल चित्रपट चैतन्यच्या भावनिक जगाशी जोडलेला आहे, जन्मदात्या आईच्या प्रेमाचा अनुभव घेण्याच्या अनपेक्षित प्रवासाचे सुंदर वर्णन या चित्रपटात केले गेले आहे.

नाळ कास्टिंग

 • चैतन्य भोसले (चैत्या): श्रीनिवास पोकळे
 • चैत्याचा मित्र बच्चन: संकेत इटणकर
 • चैत्याचे वडील: नागराज पोपटराव मंजुळे
 • चैत्याची आई: देविका दफ्तरदार
 • चैत्याची आजी: सेवा चव्हाण
 • देवी: मैथिली ठाकरे
 • पार्वती: दीप्ती देवी
 • गज्या: गणेश देशमुख
 • चैत्याचा मामा: ओम भुतकर

इतर माहिती

 • दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी याकांती
 • निर्माता:
  • नागराज मंजुळे
  • सुधाकर रेड्डी याकांती
  • वैशाली विराज लोंढे
  • निखिल वरडकर
  • नितीन प्रकाश वैद्य
  • प्रशांत मधुसूदन पेठे
 • लेखक: नागराज मंजुळे (संवाद)
 • पटकथाः सुधाकर रेड्डी याकांती
 • कथा: सुधाकर रेड्डी याकांती
 • संगीत:
  • अद्वैत नेमलेकर
  • ए.व्ही. प्रफुल्लचंद्र (अतिथी संगीतकार)
 • छायांकन: सुधाकर रेड्डी याकांती
 • निर्मिती कंपनी: झी स्टुडिओ
 • वितरक: आटपाट फिल्म्स
 • प्रकाशन तारीख: १६ नोव्हेंबर २०१८
 • रनिंग टाइम: १ तास ५७ मिनिटे
 • भाषा: मराठी
 • बजेट: ३ कोटी
 • बॉक्स ऑफिस: ४० कोटी

Reference: Naal, IMDb

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.