करमणूक

नेटफ्लिक्स (Netflix)

नेटफ्लिक्स डाउनलोड, मिनिंग, सीरीज लिस्ट, प्लान्स माहिती मराठी
Netflix

नेटफ्लिक्स एक अमेरिकन मीडिया सर्व्हिसेस प्रोव्हायडर आणि प्रोडक्शन कंपनी आहे जिचे मुख्यालय लॉस गॅटोस, कॅलिफोर्निया येथे आहे. कॅलिफोर्नियातील स्कॉट्स व्हॅली येथे रीड हेस्टिंग्ज आणि मार्क रँडॉल्फ यांनी १९९७ मध्ये याची स्थापना केली. कंपनीचा प्राथमिक व्यवसाय ही त्याची सदस्यता आधारित स्ट्रीमिंग सेवा आहे जी चित्रपट, दूरदर्शन प्रोग्राम आणि इनहाऊस लायब्ररीचे ऑनलाइन स्ट्रीमिंग ऑफर करते.

एप्रिल २०१९ पर्यंत, नेटफ्लिक्सची जगभरात १४८ दशलक्षाहून अधिक पेड सब्स्क्रिप्शन आहे, ज्यात अमेरिकेत ६० दशलक्ष अकाउंट आहेत. फ्री सब्स्क्रिप्शन अकाउंट मिळून एकूण १५४ दशलक्षाहून अधिक सदस्यता आहेत. मुख्य भूमी चीन (स्थानिक निर्बंधामुळे), सिरिया, उत्तर कोरिया, इराण आणि क्रिमिया (अमेरिकेच्या निर्बंधामुळे) वगळता हे जगभरात उपलब्ध आहे. या कंपनीची नेदरलँड्स, ब्राझील, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया येथे कार्यालये आहेत. नेटफ्लिक्स मोशन पिक्चर असोसिएशनचे (एमपीए) सदस्य आहेत.

नेटफ्लिक्सच्या प्रारंभिक व्यवसाय मॉडेलमध्ये डीव्हीडी विक्री आणि मेलद्वारे डीव्हीडी रेंटल समाविष्ट होते. डीव्हीडी आणि ब्लू-रे रेंटल व्यवसाय टिकवून ठेवताना मीडिया स्ट्रीमिंग परिचयातून नेटफ्लिक्सने २०१० मध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. २०१० मध्ये कॅनडा, नंतर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये कंपनीचा आंतरराष्ट्रीय विस्तार झाला. नेटफ्लिक्सने २०१२ मध्ये लिलीहॅमर या सिरीयस पासून कन्टेन्ट प्रोडक्शन इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले.

नेटफ्लिक्सने सप्टेंबर 1999 मध्ये मासिक सब्स्क्रिप्शन संकल्पना आणली आणि त्यानंतर २००० च्या सुरुवातीला रेंटल मॉडेल सोडले. तेव्हापासून कंपनीने फ्लॅट-फी अमर्यादित रेंटल मॉडेलवर आपली प्रतिष्ठा वाढविली आहे.

इतिहास

२००० मध्ये, जेव्हा नेटफ्लिक्सचे फक्त ३००००० ग्राहक होते आणि त्यांच्या डीव्हीडीच्या वितरणासाठी ते अमेरिकेच्या पोस्टल सर्व्हिसवर अवलंबून होते, कंपनीला तोटा होत होता तेव्हा ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची ब्लॉकबस्टरकडून कंपनी विकत घेण्याची ऑफर आली. या ऑफर नुसार; नेटफ्लिक्सचे नाव ब्लॉकबस्टर डॉट कॉम असे ठेवून ते ऑनलाइन व्यवसाय हाताळतील आणि ब्लॉकबस्टर डीव्हीडी रेंटल सांभाळेल असा प्रस्ताव त्यांनी मांडला. नेटफ्लिक्स ने ही ऑफर नाकारली.

२००१ च्या सुरुवातीच्या काळात, नेटफ्लिक्स ने वेगवान वाढ अनुभवली. पण याच दरम्यान डॉट-कॉम बबल फुटला आणि ११ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यामुळे कंपनीवर वाईट परिणाम झाला आणि त्यांच्या १२० कर्मचाऱ्यापैकी एक तृतीयांश कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्यास भाग पाडले. २००२ मध्ये डीव्हीडी प्लेयरची विक्री अधिक स्वस्त झाल्यामुळे थँक्सगिव्हिंगच्या वेळेस याचा खूप खप झाला. २००२ च्या सुरुवातीच्या काळात नेटफ्लिक्सच्या सब्स्क्रिप्शन मध्ये खूप वाढ झाली.

नेटफ्लिक्सने २ मे, २००२ रोजी आयपीओ सुरू केला आणि ५.५ दशलक्ष शेअर्स १५ डॉलर प्रति शेअर दराने विक्री केली. १४ जून २००२ रोजी कंपनीने अतिरिक्त ८२५००० शेअर्स विकले. पहिल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर नेटफ्लिक्सने आर्थिक वर्ष २००३ मध्ये पहिला नफा कमावला आणि २७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या उत्पन्नावर ६.५ दशलक्ष डॉलर्स नफा मिळविला. २००५ मध्ये, ३५००० विविध चित्रपट उपलब्ध होते आणि नेटफ्लिक्सने दररोज १ दशलक्ष रेंटल डीव्हीडी पाठवल्या.

खूप वेळापासून कंपनीने ऑनलाइन चित्रपट वितरित करण्याचा विचार केला होता. पण २००० च्या दशकात मध्यभागी हे शक्य झाले जेव्हा डेटाची गती आणि बँडविड्थची किंमत सुधारली. मूळ कल्पना एक “नेटफ्लिक्स बॉक्स” बनवायची होती, जो रात्री चित्रपट डाउनलोड करू शकेल आणि दुसर्‍या दिवशी ते पहाण्यासाठी सज्ज असेल. २००५ पर्यंत, त्यांनी चित्रपटाचे हक्क संपादन केले, बॉक्स आणि सेवा डिझाइन केली आणि त्यासह ती सेवा सार्वजनिक होण्यास सज्ज झाली. परंतु यूट्यूबची लोकप्रियता पाहून, हार्डवेअर डिव्हाइस बनवण्याची संकल्पना रद्द केली गेली आणि त्याऐवजी २००७ मध्ये स्ट्रीमिंग सर्विस सुरु केली.

नेटफ्लिक्सने आपल्या ग्राहकांच्या रेटिंग्ज आणि रिव्हू आधारित एक विस्तृत वैयक्तिकृत व्हिडिओ-शिफारस प्रणाली विकसित केली. १ ऑक्टोबर २००६ रोजी, नेटफ्लिक्सने तेव्हाच्या सिनेमॅच व्हिडिओ-शिफारस अल्गोरिदम पेक्षा चांगले अल्गोरिदम बनवण्यासाठी १०००००० डॉलर्सचे बक्षीस ऑफर केले.

फेब्रुवारी २००७ मध्ये, कंपनीने आपली अब्जावधी डीव्हीडी डिलिव्हरी केली आणि इंटरनेटद्वारे मागणीनुसार व्हिडिओ (ऑन डिमांड ) सादर करून डीव्हीडीच्या मूळ व्यवसाय मॉडेलपासून दूर जाण्यास सुरवात केली.

नेटफ्लिक्स ची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तसतसे प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची संख्याही वाढत गेली. जून २००९ मध्ये ते १२,००० चित्रपट आणि कार्यक्रम प्लॅटफॉर्मवर होते. नेटफ्लिक्स बद्दलची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात सिनेमॅच नावाची एक शिफारस प्रणाली होती.

नेटफ्लिक्स डाउनलोड

नेटफ्लिक्स एप अँड्रॉइड आणि आयट्यून वर उपलब्ध आहे. हे एक फ्री एप आहे. पेड प्लॅन मध्ये तुम्ही सिरीज, मूव्हीएस आपल्या मोबाईल वर डाउनलोड करू शकता आणि ऑफलाईन असताना पाहू शकता. हा डाउनलोडेड कन्टेन्ट एन्क्रिप्टेड फॉरमॅट मध्ये असतो जो कॉपी करता येत नाही, आणि जरी केला तरी एप बाहेर पाहता येत नाही. नेटफ्लिक्स स्मार्ट टीव्ही, प्लेस्टेशन, क्स-बॉक्स, क्रोमकास्ट, अप्पलटीव्ही, ब्लु-रे प्लेयर्स वर सुद्धा पाहता येते.

नेटफ्लिक्स प्लान्स अँड प्रायसिंग

नेटफ्लिक्स चे भारतामध्ये सध्या ४ प्लान्स चालू आहेत; मोबाईल, बेसिक, स्टॅंडर्ड, प्रीमियम; त्यांची किंमत १९९, ४९९, ६४९, ७९९ अशी आहे. सर्व प्लॅन पहिल्या एक महिन्यासाठी फ्री आहेत पण सबस्क्राईब करताना क्रेडिट कार्ड डिटेल्स द्यावे लागतात, तुम्ही फ्री प्लॅन पहिल्या एक महिन्यात कधीही कॅन्सल करू शकता.

नेटफ्लिक्स मिनिंग

“नेटफ्लिक्स” या शब्दाचे मिनिंग “इंटरनेट” आणि “फ्लिक” म्हणजे आपल्या आवडीचे चित्रपट इंटरनेट वर पाहणे किंवा याचे दुसरे मिनिंग “इंटरनेट फिल्म्स” असे होतो. पॉप कल्चर मध्ये “नेटफ्लिक्स अँड चिल” अशी फ्रेज सुद्धा प्रचलित आहे, याचा अर्थ असा होतो कि नेटफ्लिक्स वर वेब सिरीज, मुव्हीज बघा आणि रिलॅक्स व्हा.

नेटफ्लिक्स सीरीज लिस्ट

 

Reference: Netflix

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment