प्रदेश भूगोल

पँजिआ (Pangaea)

पँजिआ Information about Pangaea in Marathi
wikimedia By Kious, Jacquelyne...

पँजिआ हा एक सुपरखंड (सुपर कॉन्टिनेन्ट) होता जो पालेओझोइक आणि मेसोझोइक कालखंडात अस्तित्त्वात होता. पँजिआ अंदाजे ३३५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या खंडांच्या एकत्रीकरणामुळे बनला होता. सुमारे १७५ दशलक्ष वर्षांपूर्वी तो खंडित होऊ लागला. सध्याच्या पृथ्वीच्या विपरित पँजिआचा बराचसा भाग दक्षिणी गोलार्धात होता आणि त्याच्याभोवती एक सुपर महासागर, पन्थलस्सा होता. पँजिआ अलीकडे अस्तित्त्वात असलेला आणि भूवैज्ञानिकांनी पुनर्निर्मित केलेला पहिला सुपर कॉन्टिनेन्ट आहे.

संकल्पना

पँजिआ हे नाव प्राचीन ग्रीक शब्द pan (संपूर्ण) आणि Gaia (“मदर अर्थ, जमीन”) वरून आले आहे. खंड म्हणजे एक संलग्न भूभाग अशी संकल्पना प्रथम अल्फ्रेड वेगेनर यांनी मांडली होती. १९१२ च्या ‘द ऑरिजन ऑफ कॉन्टिनेंट्स’ (डाय एन्स्टेहंग डेर कोन्टीन्ते) या त्यांच्या प्रकाशनात त्यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या वैज्ञानिक सिद्धांताचा मांडला.

अस्तित्वाचा पुरावा

पँजिआच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे विविध खंडांमध्ये (जे आता जोडलेले नाहीत) समान आणि एकसारख्या प्रजातींच्या जीवाश्मांचा समावेश. उदाहरणार्थ, थेरपीड लिस्ट्रोसौरसचे जीवाश्म दक्षिण आफ्रिका, भारत आणि अंटार्क्टिकामध्ये सापडले आहेत. त्याचप्रमाणे, गोड्या पाण्याचे सरपटणारे प्राणी मेसोसॉरस केवळ ब्राझील आणि पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील स्थानिक भागात आढळले. जर हे सारे खंड जोडलेले नसते तर ह्या प्राण्यांचा, झाडांचा विविध खंडांवर प्रसार झालाच नसता.

References:

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment