सार्वजनिक व्यक्तिमत्व

मेगन मार्कल (Rachel Meghan Markle)

रेचल मेगन मार्कल Rachel Meghan Markle Information in Marathi
wikipedia

मेगन, डचेस ऑफ ससेक्स (जन्म: रेचल मेगन मार्कल;ऑगस्ट ४, १९८१) ही ब्रिटीश राजघराण्यातील अमेरिकन वंशाची सदस्य आणि माजी अभिनेत्री आहे.

मेगन मार्कलचा जन्म लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे झाला आणि तिला मिश्रित वांशिक वारसा आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या अभ्यासादरम्यान, तिने दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका निभावण्यास सुरुवात केली. २०११ ते २०१७ पर्यंत तिने प्रसिद्ध अमेरिकन मालिका “सूट” वर रेचेल झेनची भूमिका केली होती. ती एक स्पष्ट स्त्रीवादी आहे आणि तिने लैंगिक असमानतेच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. तिने आंतरराष्ट्रीय चॅरिटी संघटनांचे प्रतिनिधित्व केले आहे आणि २०१६ मध्ये तिने तिची क्लोदिंग लाईन चालू केली आहे.

मार्कलने अभिनेता आणि निर्माता ट्रेव्हर एंगेल्सनशी २०११ मध्ये लग्न केले होते आणि २०१३ मध्ये घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये, तिने क्वीन एलिझाबेथ २ चा नातू प्रिन्स हॅरीशी लग्न करण्याची घोषणा केली आणि ती लंडनमध्ये गेली. तिने अभिनयातून संन्यास घेतला, आपली संबंधित सोशल मीडिया खाती बंद केली आणि ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य म्हणून सार्वजनिक व्यस्ततेस सुरुवात केली. २०१८ मध्ये प्रिन्स हॅरीशी लग्नानंतर ती ससेक्सची डचेस बनली. त्यांना एक मुलगा, आर्ची माउंटबॅटन-विंडसर आहे.

अभिनय कारकीर्द

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मेगन मार्कल ने स्वतंत्ररित्या कॅलिग्राफर म्हणून काम केले आणि अभिनयाच्या संघर्षादरम्यान स्वतःला आर्थिक आधार देण्यासाठी बुकबाईंडिंग शिकवले. डे-टाइम सोप ऑपेरा जनरल हॉस्पिटलभागातील तिची नर्स म्हणून तिची पहिलीच ऑन स्क्रीन भूमिका होती. सेंचुरी सिटी (२००४), द वॉर ऐट होम (२००६) आणि सीएसआय: न्यूयॉर्क (२००६) टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये मेगन मार्कलने छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत.

अमेरिकन गेम शो “डील या नो डील, “ब्रीफकेस गर्ल” मध्ये कंत्राटी अभिनय केल्या सोबत मॉडेलिंग मधेही काम केले. फॉक्सच्या मालिका फ्रिंजमध्ये ती दुसर्‍या सत्राच्या पहिल्या दोन भागांमध्ये जुनिअर एजन्ट एमी जेसअपच्या रूपात दिसली. मेगन मार्कलने २०१० मध्ये “गेट हिम टू द ग्रीक” आणि “रिमेम्बर मी” या चित्रपटांमध्ये काम केले आणि २०११ मध्ये “हॉरिबल बॉस” या चित्रपटात ही दिसली.

जुलै २०११ मध्ये मेगन मार्कल ने यूएसए नेटवर्क शो “सूट” मध्ये काम सुरु केले. शोमधील तिचे पात्र, रेचेल झेनने पॅरालीगल म्हणून सुरू केले आणि शेवटी वकील बनली. तिने २०१७च्या उत्तरार्धात शोच्या सातव्या हंगामाचे काम पूर्ण केले. या शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. सूटवर काम करत असताना मार्कल टोरोंटो जवळील सीटन व्हिलेज मध्ये वर्षातील नऊ महिने भाड्याच्या घरात राहिली. फॉर्च्युन मासिकाचा अंदाज आहे की मार्कलला प्रति भाग $५०००० मानधन देण्यात आले होते, त्यानुसार वर्षभरात तिने सुमारे $४५०००० कमवले.

वैयक्तिक जीवन

मार्कलने २००४ मध्ये अभिनेता आणि निर्माता ट्रॅवर एंगेल्सन यांच्याबरोबर नात्याची सुरुवात केली. त्यांनी १० सप्टेंबर २०११ रोजी जमैकाच्या ओको रिओस येथे लग्न केले आणि ऑगस्ट २०१३ मध्ये घटस्फोट घेतला. सेलेब्रिटी शेफ आणि रेस्टॉरिएटर कोरी विटिएलो यांच्याशी मार्क्लचे त्यानंतरचे नाते काही वेळ टिकले आणि मे २०१६ मध्ये ते समाप्त झाले.

जून २०१६ मध्ये, मेगन मार्कलन प्रिन्स हॅरीच्या संपर्कात आली. कॉमन फ्रेंड ने घडवून आणलेल्या ब्लाइंड देत वर ते एकमेकांना भेटले. प्रिन्स हॅरी ची आजी एलिझाबेथ २ आहे ज्या युनायटेड किंगडमच्या राणी आहेत आणि १५ अन्य राष्ट्रकुल क्षेत्र, तसेच राष्ट्रकुळाच्या प्रमुख आहेत.

सप्टेंबर २०१७ मध्ये, मार्कल आणि प्रिन्स हॅरी टोरोंटोमधील इनव्हिक्टस गेम्समध्ये प्रथमच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले.

प्रिन्स हॅरीशी मार्कलच्या एंगेजमेंटची घोषणा २७ नोव्हेंबर २०१७ रोजी क्लेरेन्स हाऊस आणि केन्सिंग्टन पॅलेसने केली होती. या घोषणेमुळे राजघराण्यातील मिश्रित-वंशातील सदस्याच्या संभाव्य सामाजिक महत्त्वबद्दल सकारात्मक टिप्पण्या आल्या. मार्कलने जाहीर केले की ती अभिनयातून निवृत्त होईल आणि तिने ब्रिटीश नागरिक होण्याची प्रक्रिया सुरू झाली.

लग्नाच्या तयारीत, कँटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी रेचेल मेगन मार्कलला बॅपटाईझ केले आणि ६ मार्च २०१८ रोजी तिला चर्च ऑफ इंग्लंडमध्ये सामील केले. १९ मे रोजी सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर कॅसल येथे तिचा विवाहसोहळा पार पडला.

लग्नानंतर ड्यूक आणि डचेस मूळचे लंडनमधील नॉटिंगहॅम कॉटेज येथे केन्सिंग्टन पॅलेसच्या राहत होते. हे जोडपे नंतर दोन शतकांपेक्षा जुन्या फ्रोगमोर कॉटेज ऑफ होम पार्क ऑफ विंडसर कॅसलमध्ये गेले. ६ मे, २०१९ रोजी, डचेसने सिंहासनावर सातव्या क्रमांकावर असलेल्या आर्ची माउंटबॅटन-विंडसरला जन्म दिला.

Reference: Meghan, Duchess of Sussex

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.