चित्रपट करमणूक

तान्हाजी: द अनसंग वॉरियर

तान्हाजी चित्रपटाबद्दल माहिती मराठीमध्ये

तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा भारतीय बायोपिक अ‍ॅक्शन फिल्म आहे ज्यात अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका आहे आणि ज्यात जगपती बाबू, पंकज त्रिपाठी आणि शरद केळकर च्याही मुख्य भूमिका आहेत. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १७व्या शतकातील काळावर आधारीत आहे. तान्हाजी चित्रपट मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्यनेते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटाची प्रिन्सिपल फोटोग्राफी २५ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झाली आणि २७ डिसेंबर २०१९ रोजी जगभरात रिलीज होणार होता पण रिलीझची तारीख १० जानेवारी २०२० करण्यात आली आहे.

प्लॉट

१७व्या शतकाच्या उत्तरार्धात, मुघल सम्राट औरंगजेबाने कोंढाणा हा दक्षिण भारताची राजधानी म्हणून स्थापित करण्याची योजना केली. तथापि, मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दक्षिण भारताला मुघल आक्रमणापासून वाचवण्यासाठी कोणत्याही किमतीत कोंढाणा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तर मोगल बादशहा औरंगजेब आपला विश्वासू सेनापती उदय भान याला किल्ल्याचा कब्जा घेण्यासाठी पाठवितो. किल्ल्याच्या नियंत्रणासाठी या दोन सैन्यांत लढाई सुरू झाली. ही लढाई सिंहगडाची लढाई म्हणून ओळखली जाते, या लढाईने दक्षिण भारताचे भाग्य ठरविले.

तान्हाजी कास्ट

अजय देवगण: तानाजी मालुसरे
सैफ अली खान: उदय भान
काजोल: सावित्रीबाई मालुसरे
शरद केळकर: छत्रपती शिवाजी महाराज
ल्यूक केनी: औरंगजेब आलमगीर
पद्मावती राव: जिजाबाई
जगपति बाबू: शेलार मामा
देवदत्त नागे: सूर्याजी मालुसरे
पंकज त्रिपाठी: मिर्झा राजा जयसिंग
नेहा शर्मा: कमला देवी
अजिंक्य देव: पिसाळ
हार्दिक सांगणी: गोंद्या

उत्पादन आणि प्रकाशन

तान्हाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनची सुरुवात २० जुलै २०१७ रोजी झाली आणि मुख्य छायाचित्रण २५ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झाले.

सुरवातीला या चित्रपटाचे नाव “तान्हाजी: द अनसंग वॉरियर” असे ठेवण्यात आले होते परंतु अजय देवगण याने ट्विटरवरून सांगितले की पुढे हा चित्रपट फक्त “तान्हाजी” या नावाने ओळखला जाईल. डिसेंबर २०१७ मध्ये तान्हाजी चित्रपटाची रिलीज तारीख २२ नोव्हेंबर २०१९ सांगण्यात आली होती परंतु डिसेंबर २०१८ मध्ये दिग्दर्शक ओम राऊत यांनी ट्विटरवरुन सांगितले की शूटिंगच्या समस्येमुळे रिलीज तारीख डिसेंबर २०१९ मध्ये ढकलण्यात आली आहे.

तान्हाजी चित्रपटाच्या टीमने नोव्हेंबर २०१९ मध्ये या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर्स प्रसिद्ध केले. १ नोव्हेंबर रोजी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर टी-सीरिजने लाँच केला होता. हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी जगभरात प्रदर्शित होणार होता, परंतु २४ मार्च रोजी रिलीजची तारीख पुन्हा १० जानेवारी २०२० वर ढकलण्यात आली.

साउंडट्रॅक

या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल, सचेत-परंपरा आणि मेहुल व्यास यांनी दिले आहे. या चित्रपटाची गीते स्वानंद किर्किरे आणि अनिल वर्मा यांनी लिहिली आहेत.

References: Tanhaji (Film)

Help your friends by sharing this article with them

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.