बातम्या

टायफून हागीबिस जपान (Typhoon Hagibis 2019 Japan)

टायफून हागीबिस जपान Typhoon Hagibis 2019 Japan
news.abs-cbn.com

शनिवारी रात्री जपानमध्ये दशकांतील सर्वात शक्तिशाली वादळामुळे किमान २५ लोक मरण पावले आणि १५ जण बेपत्ता झालेआहेत. या वादळाला “टायफून हागीबिस” असे नाव देण्यात आले आहे. या चक्री वादळाला जपान मध्ये खूप नुकसान केले आहे. जपानी सरकारने आपल्या नागरिकांना या बद्दल अगोदरच सावध केले होते. फिलिपिन्स मधील तागालोग भाषेत हागीबिस या शब्दाचा अर्थ “वेग” असा होतो आणि यावरूनच या चक्री वादळाला टायफून हागीबिस असे नाव देण्यात आले आहे. शनिवारी रात्री हागीबिसने मुख्य जपानी बेटाला तासाला २१६ किलोमीटर (१४४ मैल) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने झोडपून काढले, अलिकडच्या वर्षातील हे एक सर्वात हिंसक वादळ आहे.

टायफून हागीबिस हे मागील सहा दशकातील सर्वात भयंकर वादळ म्हणून घोषित करण्यात आहे.
या वादळाने देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागातील सखल प्रदेशात खूप नुकसान केले आहे. मुसळधार पावसानंतर नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि सोबत खूप जोराचे वारे प्रचंड नुकसान करत आहे.

सैन्य, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन संस्थाना पुराने बाधित झालेल्या लोकांच्या बचावासाठी सज्ज आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. टायफून हागीबिस मुळे जपानमधील मूलभूत सुविधा खंडित झाल्या आहेत जसे वीज, वाहतूक इत्यादी.

जपान मधील शेकडो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तसेच बुलेट ट्रेन सेवा सुद्धा प्रभावित झाली आहे, जी जपानी दळणवळचा कणा आहे. जपानचे बातम्यांमध्ये सांगितले जात आहे कि अजूनपर्यंत १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. वादळाचे रूप बघता हा आकडा वाढू शकतो.

टायफून हागीबिस मुळे रग्बी वर्ल्ड कपमधील सुरवातीचे पूल स्तराचे सामने रद्द झाले आहेत. वादळाची त्रीव्रता कमी झाल्याने हळू हळू सार्वजनिक सेवा परत सुरु होत आहे, पण सरकारने चेतावणी दिली आहे कि टायफून हागीबिस परत विक्राळ रूप घेऊ शकते.

जपानचे पंतप्रधान शिन्झो अबे यांनी आपत्कालीन बैठक घेतली आणि आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांना पाठिंबा दर्शविला – हे एका महिन्याच्या अवधीत जपानमध्ये आलेले दुसरे विनाशकारी वादळ आहे.

पंतप्रधान शिन्झो अबे म्हणाले “ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जे लोक पुराने प्रभावित झाले त्यांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो.” “वीज, पाणी आणि परिवहन सारख्या निलंबित सेवा लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण भूस्खलन आणि इतर धोक्यांबाबत जागरूक राहावे.” नागानो प्रांत अत्यंत वाईट रीतीने प्रभावित झाला आहे. सरकारने म्हटले आहे की संरक्षण दलातील २७००० सदस्य आणि इतर आपत्कालीन कामगारांना तिथे तातडीने रवाना केले आहे. मार्च २०११ मध्ये प्राणघातक त्सुनामीमुळे खराब झालेल्या फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षितेबद्दल चिंता वर्तवली जात आहे.

जपानमध्ये दरड आणि वादळामुळे कमीतकमी २ लोक मृत झाले आहेत. अधिकाऱ्यानी आणि स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे की हजारो बचाव कर्मी आपले काम निरंतर करत आहेत. टायफून हागीबिस रविवारी सकाळी भूमीपासून दूर सरकले यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले.

१,००,००० हून अधिक बचावकर्त्यांनी सैनिकांसह पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मुसळधार पावसामुळे खूप ठिकाणी दरड कोसळल्या आहेत, नदीकाठ फुटले आहे तसेच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मध्य जपानच्या नागानो व जवळील भागात चिकूमा नदीचे पाणी रहिवासी भागात २ मजली उंचीपर्यंत घुसले आहे.

सैन्य व अग्निशमन विभागाच्या हेलिकॉप्टरने अनेक ठिकाणी छतावरून व बाल्कनीतून लोकांना वाचवले आहे पण फुकुशिमा येथे हेलिकॉप्टर मधून बचाव होताना खाली पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. टोकियोच्या वायव्येकडील कावागो वृद्धाश्रमातून बोटीच्या साहाय्याने शेकडो लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकर्मींनी प्रयत्न केले, इथे वरच्या मजल्यापर्यंत पूर आला होता.

References: iran-daily.com , theguardian.com

About the author

BharatBodh Team

आम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Comment